ऐन दिवाळीच्याच दिवशी फोडले सोन्याचे दुकान; मध्यरात्रीचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व शोकेशमध्ये ठेवलेल्या ट्रेमधील ३५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या मुरण्या, ५०० ग्रॅम चांदीच्या वस्तू किंमत ३० हजार, चार हजार रुपये किमतीच्या पितळी मूर्ती चोरल्या

लासलगाव(जि.नाशिक) : दिवाळीच्या दिवशीच खेडलेझुंगे येथील अलंकार सोन्याचे दुकान फोडून ६९ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

खेडलेझुंगे येथे सोन्याचे दुकान फोडले 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. १४) रात्री दोनच्या दरम्यान खेडलेझुंगे (ता. निफाड) येथील वज्रेश्वरी अलंकार दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व शोकेशमध्ये ठेवलेल्या ट्रेमधील ३५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या मुरण्या, ५०० ग्रॅम चांदीच्या वस्तू किंमत ३० हजार, चार हजार रुपये किमतीच्या पितळी मूर्ती, असे एकूण ६९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत गणेश राजेंद्र चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold theft at Khedlezunge Jewelery shop nashik marathi news