esakal | हौसेला मोल नसतं! कोरोना संकटात बनवला गोल्डन मास्क; किंमत पाहून व्हाल थक्क
sakal

बोलून बातमी शोधा

golden mask.jpg

जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाका तोंडातुन संसर्गजन्य विषाणू शरीरात जाऊ नये म्हणून मास्कला वेगळच महत्व आले आहे. जगभरातील मास्कची मागणी पाहता अंबानी पासून अनेक मोठे उद्योग समूह या व्यवसायात प्रवेश केला आहे.

हौसेला मोल नसतं! कोरोना संकटात बनवला गोल्डन मास्क; किंमत पाहून व्हाल थक्क

sakal_logo
By
सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर :  जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाका तोंडातुन संसर्गजन्य विषाणू शरीरात जाऊ नये म्हणून मास्कला वेगळच महत्व आले आहे. जगभरातील मास्कची मागणी पाहता अंबानी पासून अनेक मोठे उद्योग समूह या व्यवसायात प्रवेश केला आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला बचत गटांना कोरोनाच्या काळात महिला वर्गाला मास तयार करण्याचे मोठ्या प्रमाणावर काम मिळाल्याने थोडा का होईना याच मास्क आर्थिक दिलासाही या महिला वर्गाला दिला आहे. पण अशातच अनेकांच्या हौशेलाही मोल नसते. ते म्हणतात ना..याचं एक उदाहरण नाशिक सातपूर येथे राहणाऱ्या मकरंद साळी दिले आहे.

सातपूर चा गोल्डन मॅनचा गोल्डन मास्क

हल्ली महिला वर्गाला साडीच्या कलर्सनुसार मास्क ही मॅचिगं वापण्याची फॅशन सुरू झाली आहे. त्यामुळे विविध आकाराचे व कलर मध्ये मास्क बाजारात उपलब्ध झाले आहेत. असो... सातपूर चा गोल्डन मॅन म्हणून परिचीत असलेले मकरंद साळी यांना अंगावर विविध प्रकारचे सोन्याचे दागीने घालायला खुपच आवडते. त्यानी आतापर्यंत किमान साडेतीन किलोचे गळ्यातील साखळ्यां, कडे, अंगठ्या आदी वस्तू रोज ते वापरतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी सातपूर मधीलच दंडगव्हाळ सुवर्ण पिढीतून तब्बल दोन लाख दहा हजार रूपयाचा मास्क तयार केला आहे. या गोल्डन मास्कमुळे पुन्हा एकदा सातपूरच्या बाबा टेलर्सची चर्चा सुरू झाली आहे. हा मास्क गोविंद दंडगव्हाळ,सातपूर ता सुवर्णपेढीने ( पावणेचार तोळे ) सोने वापरुन तयार केला. सातपूर परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

तब्बल दोन लाख दहा हजार रूपयाचा मास्क

सातपूरचे गोल्ड मॅन्यूफॅक्चर म्हणून परिचीत असलेले बाबा टेलर्सचे संचालक मकरंद साठी यांनी कोरोनाच्या काळात तब्बल दोन लाख दहा हजार रूपयाचा मास सातपूरच्याच दंडगव्हाळ सुवर्ण पिढीतून बनवून घेतले आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

संपादन - ज्योती देवरे