विठ्ठलभक्तांसाठी खूशखबर! 'आषाढी' फराळाचा आता बिनधास्त घ्या आस्वाद...कारण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील घराघरांत उपवास केले जातात. बुधवारी (ता. 1) असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. या वर्षी उपवासाच्या पदार्थांच्या भावामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. 

नाशिक  : आषाढी एकादशीनिमित्त घरोघरी लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण उपवास करतात. महाराष्ट्रात या एकादशीला विशेष महत्त्व आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी जरी नाही करता आली तरीही उपवास तर मात्र हमखास असणारच...त्यातल्या त्यात यंदा साबूदाणा, शेंगदाणा, भगर, रताळ्याचे दर स्थिर असल्याने विठ्ठलभक्तांसाठी जरा दिलासा मिळणार आहे. 

तयार पिठांनाही ग्राहकांकडून मागणी

गेल्या वर्षी साबूदाण्याचे भाव 80 रुपये किलो होते. यावर्षी 55 ते 70 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच शेंगदाणे, भगर, राजगिरा, खजूर, रताळे यांसारख्या पदार्थांच्या भावात मात्र वाढ किंवा घट झालेली नाही. या वर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने रेडिमेड उपवासाचे पदार्थ घेण्याऐवजी घरातच ते बनविण्याकडे महिलांचा कल असल्याचे चित्र आहे. रताळी विक्री करण्यासाठी ग्रामीण भागातून विक्रेते शहराच्या काही भागात दाखल झाले आहेत. तसेच राजगीरा पीठ, साबूदाणा पीठ, शिंगाडा पीठ, भगरीचे पीठ यांसारख्या तयार पिठांनाही ग्राहकांकडून मागणी होत आहे. 

उपवासाच्या पदार्थांचे किलोचे दर (रुपयांत) 

साबूदाणा : 55 ते 70  
शेंगदाणे : 90 ते 110   
भगर : 90
राजगिरा : 80 
खजूर : 140 ते 260  
रताळे : 60 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

आषाढी एकादशीनिमित्त भाविकांकडून उपवासाच्या पदार्थांना मागणी आहे. मात्र या सर्वच पदार्थांचे दर स्थिर आहेत. - विजय पटेल, शिवशक्ती ट्रेडिंग कंपनी, नाशिक 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for Vitthal devotees: Prices of Sago, Peanut, Bhagar, Yam are stable nashik marathi news