क्षणार्धात होत्याचं नव्हतं; लेकीला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश...वाचा काय घडले?

रतन चौधरी
Monday, 14 September 2020

वय वर्षे अवघे पंधरा...दीक्षा अभ्यास तर हुशार होतीच पण आईला स्वयंपाकात व शेतीकामात देखील तिचा हातभार असायचा. शाळेला सुट्ट्या आहे म्हणून आईसोबत शेतात गेली. पण क्रूर नियतीचा असा घेरा आला की क्षणात सगळं विस्कटलं. लेकीला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश...

नाशिक : (सुरगाणा) वय वर्षे अवघे पंधरा...दीक्षा अभ्यास तर हुशार होतीच पण आईला स्वयंपाकात व शेतीकामात देखील तिचा हातभार असायचा. शाळेला सुट्ट्या आहे म्हणून आईसोबत शेतात गेली. पण क्रूर नियतीचा असा घेरा आला की क्षणात सगळं विस्कटलं. लेकीला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश...

अशी घडली घटना

दीक्षा दत्तू धूम पळशेत येथील शासकीय आश्रमशाळेत नववीत शिकत होती. वय वर्षे अवघे पंधरा. शाळेत अभ्सात तर हुशारच, पण शेती कामात देखील आई-वडिलांना तिचा हातभार असायचा. रविवारी (ता. १३) हा दिवस जणू तिच्यासाठी काळा दिवसच ठरला. आपल्या शेतात उडीद पिकाची निंदणी करत असताना तिला सापाने चावा घेतला. तिच्या ते लक्षात आल्यानंतर तिला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले. मात्र दीक्षाची प्रकृती चिंताजनक झाल्याने ग्रामीण रुग्णालय आणि नंतर अधिक उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Ashram schoolgirl dies of snake bite in surgana nashik marathi news