esakal | शासनाकडून मालेगाव महानगरपालिकेला दोन कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse 1234.jpg

शहर व परिसरातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. राज्य शासनाने महापालिकेला दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, प्रतिबंधात्मक नियम व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा, पश्‍चिम भागात ट्रेनिंग व तपासणी शिबिर सुरू करा,​

शासनाकडून मालेगाव महानगरपालिकेला दोन कोटींचा निधी

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : शहर व परिसरातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. राज्य शासनाने महापालिकेला दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, प्रतिबंधात्मक नियम व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा, पश्‍चिम भागात ट्रेनिंग व तपासणी शिबिर सुरू करा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णालयांत कोरोनाबाधितांवर उपचारासाठी नियोजन करा अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. १४) येथे दिल्या. 

अधिकाऱ्यांची आढावा बैठक
शहरातील कोरोनाचे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भुसे यांनी शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची, तर महापालिकेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीत डॉ. जयंत पवार, मनपा गटनेते सुनील गायकवाड, दिनेश ठाकरे, भारत चव्हाण, मदन गायकवाड आदींनी विविध सूचना केल्या. प्रामुख्याने शहरातील खासगी डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करावेत, असा अनेकांचा सूर होता. या वेळी आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. हितेश महाले, संजय दुसाने, हरिप्रसाद गुप्ता, प्रशांत पवार, संदीप पवार, केवळ हिरे, सुनील देवरे, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, किशोर इंगळे, धर्मा भामरे, विजय पवार, रवींद्र पवार, विवेक वारूळे आदींसह महापालिकेतील प्रमुख अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. 

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन
 
आज व उद्या स्क्रीनिंगसह तपासणी शिबिर 
महापालिकेकडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टला संगमेश्वर वाल्मीकनगर शाळेत, तर १६ ऑगस्टला गणपती मंदिर, शरदनगर, कलेक्टर पट्टा येथे मोफत तपासणी शिबिर होणार आहे. शिबिरात नागरिकांची स्क्रीनिंग, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात येतील. संशयित रुग्णांना स्वॅब देण्यासाठी पुढे संदर्भित केले जाईल. नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भुसे व श्री. कासार यांनी केले.  

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - ज्योती देवरे