बिबट्याच्या हल्ल्यातून आजोबांनी वाचविले चिमुरड्याचे प्राण...दहशत अजूनही कायम

lapurd_.jpg
lapurd_.jpg

नाशिक : महापालिका हद्दीतील चेहेडी शिवारातील सातपुते मळ्यात बिबट्याने आठ वर्षांच्या बालकावर हल्ला केला. प्रसंगावधान राखत मुलाच्या आजोबांनी चिमुकल्याचा जीव वाचविला. आतापर्यत बिबट्याच्या हल्यात एका ज्येष्ठांसह तीन चिमुरड्यांना जीव गमावावा लागला आहे.  त्यामुळे दारणेकाठच्या गावात नरभक्षक बिबट्याची दहशत अजूनही कायम  आहे. 

काय घडले नेमके?

आयुष जयंत सातपुते (वय 8) असे जखमी मुलाचे नाव असून त्याला आधी बिटको रुग्णालयात त्यानंतर तर रात्री उशीरा आपोलो रुग्णालयात हलविण्यात आले. आज सायंकाळी सातच्या सुमारास चेहेडीतील सातपुते मळ्यातील नेताजी काशिनाथ सातपूते हे त्यांचा नातून आयुष (वय 8) याला घेउन शेजारच्या घरात जात असतांना बिबट्याने हल्ला केल्याने आजोबा नेताजी यांनी प्रसंगावधान राखत जवळच पडलेली वीट बिबट्याला फेकून मारल्याने बिबट्या पळून गेला व आजोबांमुळे आयुष बिबट्याच्या तावडीतून सुखरूप सुटला. 

त्याची दहशत कायम

दोन दिवसांपूर्वी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ केशव बोराडे यांच्या घराजवळील कुत्रा बिबट्याने पळवला होता. शनिवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली व पिंजरा दुसऱ्या ठिकाणी बदलून लावला.त्यानंतर आज पून्हा तोच सायंकाळी साडेसातच्या सुमारास चेहेडी शिवारातील नेताजी सातपुते यांच्या घराबाहेर नातू आदित्य भाऊसाहेब सातपुते (वय 8) च्यावर बिबट्याने हल्ला केला. त्याच्या पोटाला आणि पाठीला जखम आहे. घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या धूम ठोकली. जखमी मुलाला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com