ग्रेपनेट प्रणालीद्वारे द्राक्षे निर्यातीची नोंदणी सुरू; २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

निर्यातक्षम द्राक्षबागांची २०२०-२१ साठी ग्रेपनेट प्रणालीद्वारे नोंदणी सुरू झाली आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना नोंदणी बंधनकारक आहे. २०१९-२० मध्ये ३३ हजार ४५१ बागांची नोंदणी झाली होती. तीन दिवसांपासून सुरू झालेली नोंदणी २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 

नाशिक : निर्यातक्षम द्राक्षबागांची २०२०-२१ साठी ग्रेपनेट प्रणालीद्वारे नोंदणी सुरू झाली आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना नोंदणी बंधनकारक आहे. २०१९-२० मध्ये ३३ हजार ४५१ बागांची नोंदणी झाली होती. तीन दिवसांपासून सुरू झालेली नोंदणी २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 

गेल्या वर्षी ३३ हजार बागांची नोंदणी
 
फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की कीडनाशक उर्वरित अंश व कीडरोगांची हमी देण्यासाठी ग्रेपनेटद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी केली जाते. सूचनांनुसार आवश्‍यक अशलेल्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने द्राक्षांसाठी कायदेशीर प्रमाणित औषधांची यादी आणि द्राक्षांसाठी २०२०-२१ मध्ये वापरण्याच्या औषधांची यादी अंतिम करून ग्रेपनेट प्रणालीवर ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा द्राक्ष उत्पादकांनी नोंदणी, नूतनीकरणासाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व कृषी तालुकाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ अर्ज करावेत. निर्यातक्षम द्राक्ष बागेच्या नूतनीकरणासाठी केवळ अर्ज करणे आवश्‍यक आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

नवीन नोंदणीसाठी आवश्‍यक 

विहित नमुन्यातील अर्ज 
सात-बारा, आठ-अ 
द्राक्षबागेचा नकाशा 
नोंदणी शुल्क ५० रुपये 

हेही वाचा >  हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grapes through the grapenet system Export registration started nashik marathi news