सलग आठ तासांत ५५ मुलींवर मेकअप! पूजा देसाईच्या सौंदर्यप्रसाधन विक्रमाची गीनिज रेकॉर्ड्समध्ये नोंद 

दीपक देशमुख
Wednesday, 14 October 2020

विक्रमवीर पूजा ही झोडगे गावातील प्रगतिशील शेतकरी यशवंत देसाई यांची कन्या. संदीप कला महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. पूजा हिने मेकअपच्या क्षेत्रात गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स २०२१ आवृत्तीत वैशिष्ट्यीकृत करून आंतरराष्ट्रीयस्तरावर नवसारी व झोडगे गावचे नाव पुढे आणले आहे.

झोडगे (जि.नाशिक) : वेगवेगळ्या युवतींची अवघ्या आठ तासांत मेकअप करण्याचा सौंदर्यप्रसाधनातील विक्रम येथील पूजा देसाई हिने नवसारी (गुजरात) येथे केला. या विक्रमाची नोंद गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स २०२१ च्या आवृत्तीत झाली आहे. पूजा देसाई हिने हा विक्रम १५ सप्टेंबरला केला.

सर्वाधिक ५५ मुलींचा मेकअप करून रेकॉर्ड

पूजा हिने आधीच्या ३२ मुलींचे रेकॉर्ड मोडकळीस काढत तिने सर्वाधिक ५५ मुलींचा मेकअप करून रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विक्रमवीर पूजा ही झोडगे गावातील प्रगतिशील शेतकरी यशवंत देसाई यांची कन्या. संदीप कला महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. पूजा हिने मेकअपच्या क्षेत्रात गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्स २०२१ आवृत्तीत वैशिष्ट्यीकृत करून आंतरराष्ट्रीयस्तरावर नवसारी व झोडगे गावचे नाव पुढे आणले आहे. उत्साही मेकअप आर्टिस्ट मिस पूजा देसाई हिने आधीचा विक्रम मोडत आपले नाव त्या विक्रमधारकापुढे ठेवण्याची तयारी दर्शविली आणि त्यासाठी तयारी सुरू केली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

वयाच्या २० व्या वर्षी आपले नाव विश्व रेकॉर्डमध्ये

हे लक्षात ठेवून १५ सप्टेंबरला सलग आठ तासांत ५५ मुलींवर मेकअप करून ३२ मुलींचा मेकअप करण्याचा विक्रम मोडला आणि आवश्यक कागदपत्रे तसेच सर्व पुरावे गीनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या टिमकडे पाठविली. अशाप्रकारे मेकअप क्षेत्रात पूजा देसाई हिने वयाच्या २० व्या वर्षी आपले नाव विश्व रेकॉर्डमध्ये नोंदविले. जुन्या रेकॉर्डला मागे टाकल्यानंतर पूजा देसाई यांना ब्रँड न्यू जीडब्ल्यूआर २०२१ आवृत्तीतील वैशिष्ट्यांसह यशस्वी प्रयत्नासाठी अधिकृत नोंदवही प्रमाणपत्र व मेडल प्राप्त झाले आहे. तिला आई उज्ज्वला देसाई यांचे सहकार्य लाभले.  

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guinness World Records registered Pooja Desai cosmetics record nashik marathi news