"तुझ्यात प्रोब्लेम आहे, तुला मुल नाही होणार' माहेरून पैसे तरी आण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पती वारंवार "तुझे तलाक देके दूसरी शादी करूंगा' असा दम देत असल्याचे तहसीनाने तक्रारीत म्हटले आहे. शहरातील तवक्कलनगर भागातील तहसीना शाहरुख पठाण हिच्याशी शाहरुखचा विवाह झाला. 2018 मध्ये विवाह झाल्यापासून पतीसह सासरकडच्यांनी छळ सुरू केला.

नाशिक : "तुझे पेट में तकलीब है, तुझे बच्चा नहीं होगा' असे टोचून बोलत कर्ज फेडण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ व तलाक देण्याची धमकी देणाऱ्या शाहरुख पठाण (रा. कसबे सुकेणे) याच्यासह नऊ जणांविरुद्ध येथील आझादनगर पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला प्रकार...

शहरातील तवक्कलनगर भागातील तहसीना शाहरुख पठाण हिच्याशी शाहरुखचा विवाह झाला. 2018 मध्ये विवाह झाल्यापासून पतीसह सासरकडच्यांनी छळ सुरू केला. पती वारंवार "तुझे तलाक देके दूसरी शादी करूंगा' असा दम देत असल्याचे तहसीनाने तक्रारीत म्हटले आहे. आझादनगर पोलिस ठाण्यात शाहरुखसह नऊ जणांविरुद्ध विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकराने चक्क 'तिचा' गर्भपातही केला...त्यानंतर...

मुंबईतील विवाहितेचा छळ 
माहेरून पतीला नोकरीसाठी 20 लाख रुपये आणावेत यासाठी रेखा चेवले (वय 38, रा. विठ्ठलनगर, बोरीवली, मुंबई) या विवाहितेचा छळ करणारा पती अरुण चेवले याच्यासह चौघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेखा ही जेऊर (ता. मालेगाव) येथील माहेरवाशीण आहे. पैशाची मागणी पूर्ण न केल्याने पतीसह संशयित वेळोवेळी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harassment of woman case Nashik Crime Marathi News