
नाशिक : लॉकडाऊनमुळे महापालिकेला सुमारे शंभर, सव्वाशे कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागल्याने यंदाच्या वर्षी आर्थिक तंगी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा काळात कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे मंजुर करण्याची गरज असताना या तंगीच्या काळातही अठरा कोटी रुपयांच्या गोदावरी पुलाच्या कामाला मंजुरी देण्याचा खटाटोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून सुरु असल्याने संकट काळात संधी साधण्याच्या या प्रकार पालिकेला कर्जाच्या खाईत बुडविणारा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जीवापेक्षा पुल महत्वाचा असल्याचे चित्र
सन 2019 मध्ये गोदावरी नदीवर सुमारे 32 कोटी रुपयांचे दोन पुल बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मुळात गोदावरी नदीवर पुलांची गरज नसताना 32 कोटी रुपये खर्च करण्यावरून वादंग निर्माण झाले होते. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच भाजपच्या मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी देखील सत्ताधारी भाजपलाचं घरचा आहेर दिला होता. नवीन पुलामुळे पुरपातळीचा धोका कसा वाढेल याबाबत अनेकदा ओरडदेखील त्यांनी केली होती पंरतू नंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांच्यासह आमदार फरांदे यांचा आवाज क्षीण झाला.
अठरा कोटी रुपये किंमतीच्या पुलाचा प्रस्ताव
पुलांसाठी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पामध्ये तीन कोटी रुपयांची तरतुद आहे. त्याचा आधार घेत स्थायी समितीवर सुमारे अठरा कोटी रुपये किंमतीच्या पुलाच्या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कोव्हीड 19 मुळे महापालिकेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अशा वेळी कामांचा प्राधान्यक्रम ठरविताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय विभागाला अधिक निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना बांधकाम विभागाला त्याऐवजी शहरात पुल होणे महत्वाचे वाटतं आहे.
पुलाच्या ठेक्याला महाजनांचा आशिर्वाद
नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांची पडछाया म्हणून वावरणाऱ्या एका भाजप कार्यकर्त्याचा पुलाच्या कामाशी जवळचा संबंध आहे. कामाचा ठेका मे. सिताराम इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीला मिळाला असला तरी प्रत्यक्षात बोरा नामक व्यक्तीचं हे काम पाहणार आहे. महाजन यांच्या कार्यकर्त्याचा थेट संबंध येत असल्याने भाजपकडून देखील प्रस्ताव मंजुरीसाठी घाई केली जात आहे. त्यामुळेचं स्थायी समितीवर प्रस्ताव दाखल झाला आहे.
कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणी निर्माण होणार असल्याने कामांचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. यासंदर्भात महापौर व आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अत्यावश्यक कामेच पुर्ण करावी असा भाजपचा आग्रह राहील.- जगदीश पाटील, भाजप गटनेते, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.