
रावळगाव (ता. मालेगाव) येथील वडक्ते कुटुंबाने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. दत्तात्रय वडक्ते व त्यांच्या पत्नी जयवंताबाई वडक्ते यांच्या प्रभावी सामाजिक कार्यामुळे मतदारांनी कुटुंबीयांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे.
मालेगाव (जि.नाशिक) : रावळगाव (ता. मालेगाव) येथील वडक्ते कुटुंबाने ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. दत्तात्रय वडक्ते व त्यांच्या पत्नी जयवंताबाई वडक्ते यांच्या प्रभावी सामाजिक कार्यामुळे मतदारांनी कुटुंबीयांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे.
मतदारांनी कुटुंबीयांना दिली तिसऱ्यांदा संधी
दत्तात्रय वडक्ते यांनाही मतदारांनी यापूर्वी संधी दिली. त्यांनी तीन महिने सरपंच, तर १८ महिने उपसरपंच म्हणून काम पाहिले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग दोनमधून जयवंताबाई वडक्ते सर्वाधिक ४४५ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या कार्यकाळात जलस्वराज्य योजनेंतर्गत जलकुंभ बांधण्यात आला. समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळाखोल्यांचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी प्रभावी कामे त्यांनी मार्गी लावली. रावळगावला पाणीपुरवठा करणारा डंकीण तलाव ग्रामपंचायतीच्या मालकीचा होण्यासाठी पाठपुरावा केला.
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
आश्वासनांची पूर्ती करणार - वडक्ते
वडक्ते यांचा राममंदिराचे नूतनीकरण व वृक्षलागवडीत सहभाग राहिला. गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात ते अग्रभागी असतात. जयवंताबाई सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. मतदारांशी नेहमी जनसंपर्क ठेवत त्यांची कामे मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा संधी दिली. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली जाईल, तसेच नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ, असे वडक्ते यांनी सांगितले.
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच