मोबाईल बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर पोर्टेबल मास्क?...'या' अवलियाचा विज्ञानाविष्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे बनलेय. मात्र सततच मास्क वापरणे त्रासदायकही ठरतोय. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी येवल्यातील एका इलेक्‍ट्रॉनिक व्यावसायिकाने चक्क मोबाईलच्या बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर मास्क तयार केला आहे अन्‌ तोही अगदी कमी खर्चात... 

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे बनलेय. मात्र सततच मास्क वापरणे त्रासदायकही ठरतोय. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी येवल्यातील एका इलेक्‍ट्रॉनिक व्यावसायिकाने चक्क मोबाईलच्या बॅटरीवर चालणारा व्हेंटिलेटर मास्क तयार केला आहे अन्‌ तोही अगदी कमी खर्चात... 

अनोखा पोर्टेबल व्हेंटिलेटर मास्क

कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य बनले आहे. मात्र सातत्याने तोंडाला मास्क लावल्याने अनेकांना त्रास होतो. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. श्‍वास घ्यायला त्रास होतो, तर बऱ्याचदा वारंवार मास्कला हात लावला जात असल्याने त्याचा फायदा होत नाही. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन येवला येथील शशिकांत खंदारे या अवलिया इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्यावसायिकाने लॉकडाउनचा सदुपयोग करीत, त्यांच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स तंत्रज्ञानाचे कौशल्य वापरत मोबाईलच्या बॅटरीवर चालणारा अनोखा पोर्टेबल व्हेंटिलेटर मास्क तयार केला आहे. तब्बल 15 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना हा व्हेंटिलेटर मास्क तयार करण्यात यश आले आहे. 

दम्याचा त्रास असलेल्यांना व्हेंटिलेटर मास्क फायद्याचाच

दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांना हा व्हेंटिलेटर मास्क अधिक फायद्याचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे अत्यावश्‍यक सेवा देणारे पोलिस, आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठीदेखील हा मास्क उपयुक्त ठरू शकेल. कोरोनासोबत जगण्याची सवय करताना लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या व्हेंटिलेटर मास्कचा फायदा होणार असून, या मास्कला आणखी चांगल्या पद्धतीने आणि सुटसुटीतपणे कसे तयार करता येईल, बॅटरी बॅकअपसह अन्य सुधारणा करण्याचे सध्या शशिकांत खंदारे यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

मोबाईलच्या बॅटरीवर चालणारा हा व्हेंटिलेटर मास्क चार ते पाच तास वापरता येतो. हा व्हेंटिलेटर मास्क अगदी सहजपणे स्वतः सोबत कुठेही नेता येणे शक्‍य आहे. अधिक काळ वापरता येऊ शकतो आणि शुद्ध हवा यातून मिळते. श्‍वसनक्रियाही यामुळे चांगली राहू शकेल. येवल्यातील स्थानिक डॉक्‍टरांकडून या व्हेंटिलेटर मास्कची तपासणीही करून घेतलीय. - शशिकांत खंदारे, इलेक्‍ट्रॉनिक व्यावसायिक, येवला 

हेही वाचा > स्वच्छ भारत अभियानात नाशिकचे तारे जमीनवरच! 'या' कारणांमुळे रेटिंग पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he is created a unique portable ventilator mask that runs on a mobile battery using skills nashik marathi news