"तुम्ही खरचं देव आहात" जेव्हा आरोग्यमंत्र्यांना देव दिसतो तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 14 May 2020

आरोग्यमंत्री टोपे यांनी कोरोना संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद व मालेगाव या शहरांना भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी काल औरंगाबाद व त्यानंतर येवला, मालेगावला भेट दिली. सकाळी सुरु झालेला त्यांचा दौरा पूर्ण करुन ते मुंबईला परततांना रात्रीचे आठ वाजले होते. मात्र कंटाळा न करता त्यांनी मार्गावरील नाशिकलाही भेट दिली. सुमारे तासभर त्यांनी रुग्णालयात विविध घटकांशी चर्चा करुन उपचारांची माहिती घेतली. त्यानंतर ते पुढे रवाना झाले. 

नाशिक : कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मालेगावला दुरुस्त करण्याच्या उद्देशाने बुधवारी (ता. 13) आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगाव येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासंदर्भात आढावा बैठकही घेण्यात आली. यावेळी "तुमचे खुप खुप आभार. ईश्‍वर माणसातच पहावा लागतो. माणसातच देव असतो. तुमच्यात आज मला देव दिसला... हे कुठल्या अध्यात्मिक प्रवचनातील वाक्‍य नाही. ही उस्फुर्त प्रतिक्रीया आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची. बुधवारी टोपे यांनी कोरोना बाधीत रुग्णांसाठीच्या महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयास अचानक भेट दिली. तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी परिचारीकांनी केलेले काम, सेवा याविषयी माहिती दिली. त्यावर समाधानी झालेल्या आरोग्यमंत्र्यांनी वरिल उस्फूर्त प्रतिक्रीया व्यक्त केली. "मी तुमचे खुप खुप आभार व्यक्त करतो. तुम्ही अतिशय चांगले योगदान दिले आहे" असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्यावर उपस्थित सर्वांनीच टाळ्या वाजवल्या

परिचारिकांचे केले कौतुक
टोपे म्हणाले, सध्याची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यात अनेक आव्हाने आहेत. तुम्ही अशा परिस्थितीत जे काम करीत आहात, त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. असे म्हणतात, ईश्‍वर माणसातच पहायचा असतो. त्याची पुजा करायची असते. आज मला तो ईश्‍वर दिसला. अशा सहकाऱ्यांच्या भावना, परिश्रम यामुळे आपण सध्याच्या अडचणीच्या काळात देखील यशस्वी होऊ. तुम्ही असेच काम करीत रहा" असेही म्हणाले

आमची काहीही तक्रार नाही
या रुग्णालयात, सर्व परिचारीका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, इलेक्‍ट्रिशीयन, स्टाफ यांसह सर्वांनी रात्रदिवस काम करुन सेवा केली आहे. कोणीही कामाची तक्रार केलेली नाही. रुग्णांवरील उपचार, विचारपुस, पिण्याचे पाणी, चहा, नाश्‍ता, जेवन सगळ्यांविषयी कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेतली. परिचारिका व वैद्यकीय स्टाफला अडचणी होत्या, त्याची तक्रार न करता त्यांनीच त्यावर मार्ग काढला. याचे आम्हाला समाधान आहे, अशी माहिती मुख्य परिचारीका छाया शिंदे यांनी आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली. आरोग्यमंत्री टोपे यांनी बुधवारी रात्री नाशिक महापालिकेच्या रुग्णालयास भेट दिली. यावेळी डॉ. आवेश पलोड, डॉ. नितीन रावते यांनी त्यांना कोरोना बाधीत रुग्णांविषयी संख्या, उपचार, सुविधांची माहिती दिली. भविष्यातील नियोजन कसे असेल त्याचा आराखडा सादर केला. आरोग्यमंत्र्यांनी सबंध हॉस्पीटलची पाहणी केली. त्यानंतर कामकाजाविषयी माहिती घेतली.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

 कंटाळा न करता नाशिकलाही भेट
आरोग्यमंत्री टोपे यांनी कोरोना संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद व मालेगाव या शहरांना भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी काल औरंगाबाद व त्यानंतर येवला, मालेगावला भेट दिली. सकाळी सुरु झालेला त्यांचा दौरा पूर्ण करुन ते मुंबईला परततांना रात्रीचे आठ वाजले होते. मात्र कंटाळा न करता त्यांनी मार्गावरील नाशिकलाही भेट दिली. सुमारे तासभर त्यांनी रुग्णालयात विविध घटकांशी चर्चा करुन उपचारांची माहिती घेतली. त्यानंतर ते पुढे रवाना झाले. 

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health minister appreciate work of doctors and nurses in malegaon nashik marathi news