VIDEO : समाधानकारक पावसाने नाशिक विभाग सुखावला; मात्र 'या' जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम

heavy rain in nashik division this year nashik marathi news
heavy rain in nashik division this year nashik marathi news

नासिक रोड : सध्याच्या कोरोणाच्या संकटात पाऊस बरसत असल्यामुळे संभाव्य धोके टळले आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात पावसाने उच्छाद मांडलेला असताना यावर्षी पाऊस अपेक्षे प्रमाणे चांगला पडत असल्याचे संकेत कृषी विभागाने व्यक्त केले आहे.

नशिक विभागात यंदा पावसाची परिस्थिती चांगले असून 105 टक्के पाऊस याची नोंद झाली आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या चार जिल्ह्यांत पैकी सर्वात कमी पाऊस नंदुरबारमध्ये झाला असून येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस नंदुरबार मध्ये कमी पडलेल्या पावसाची उणीव भरून निघेल असा विश्वास सांखिकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या अस्मानी-सुलतानी संकट सध्या कोसो मैल दूर जात असून बळीराजा सुखावला आहे. नद्या-नाले धरणे तलाव बंधारे हे भरलेले असून शेतीला आवश्यक असणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचीही चिंता मिटली आहे याचाच परिणाम शासन जे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर पुरवते त्याची संख्याही बोटावर मोजण्याइतकी झाली आहे.

पावसाची टक्केवारी

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 90 टक्के पावसाची नोंद झाली असून धुळे जिल्ह्यात 137 टक्के पावसाची नोंद झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात 71 टक्के पावसाची नोंद झाली असून जळगाव जिल्ह्यात 135 टक्के पावसाची नोंद झाली आहे विभागातील पावसाची आकडेवारी 110 टक्के आहे।


काही तालुक्यांना पावसाची गरज 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर हरसुल पेठ निफाड सुरगाणा या ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. उर्वरित तालुक्यात पावसाची आवश्यकता आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा राहुरी कोपरगाव अकोला आणि कर्जत येथे चांगला पाऊस पडत असून इतर तालुक्यात अजूनही पावसाची आवश्यकता आहे. धुळे जिल्ह्यामध्ये शिंदखेडा शिरपूर धुळे येथे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा नंदुरबार व अक्कलकुवा येथे सध्या चांगला पाऊस पडत आहे जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव भुसावळ मुक्ताईनगर धरणगाव पाचोरा रावेर या ठिकाणी चांगला पाऊस पडत असून इतर ठिकाणी पावसाची आवश्यकता आहे पाचही जिल्ह्यांमध्ये विशेष करून आदिवासी भागांमध्ये चांगल्या रीतीने पाऊस पडत असून नद्या-नाले धरणे हळूहळू भरत आहेत पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाऊस पडत असल्यामुळे आवश्यक पाणी मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे.

नंदुरबार मध्ये कमी पाऊस

सध्या पाच जिल्ह्यांमध्ये उत्तम रीतीने पाऊस पडत असून आदिवासी क्षेत्र असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने यावेळी दडी मारल्याची परिस्थिती अनुभवास येत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ 395 मिलिमीटर पाऊस नंदूरबारमध्ये झाला असून येणाऱ्या काही दिवसात पावसाची आवश्यकता नंदुरबार जिल्ह्याला भासणार आहे. ऑगस्ट महिना अखेर ही पावसाची उणीव भरून निघेल असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

विभागात झालेली पावसाची नोंद आकडे मिलिमीटर मध्ये

नाशिक 639 मी मी

धुळे 560 मी मी 

नंदुरबार 487

जळगाव 657 

एकूण  110 मी मी 

यंदा विभागात चांगला पाऊस पडला असून केवळ नंदुरबार मध्ये पावसाची आवश्यकता आहे. येत्या पंधरा दिवसात ही पाऊस होऊन नंदुरबार तालुक्यात पावसाची उणीव  भरून निघेल असा आमचा अंदाज आहे. - भिवसन वारघडे, विभागीय सांख्यिकी अधिकारी नाशिक विभाग

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com