VIDEO : ती दृश्य जम्मू-काश्मिरची नव्हे..तर नाशिक जिल्ह्यातील 'या' भागातील...एकदा बघाच!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

तुम्ही पाहताय ती दृश्य जम्मू-काश्मिरची नव्हे, नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात प्रचंड गारपीट झाली. सोबतच उमराळेमध्ये शेतात, रस्त्यांवर सर्व ठिकाणी अक्षरशः गारांचा खच पडला होता. 

नाशिक : तुम्ही पाहताय ती दृश्य जम्मू-काश्मिरची नव्हे, नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात प्रचंड गारपीट झाली. सोबतच उमराळेमध्ये शेतात, रस्त्यांवर सर्व ठिकाणी अक्षरशः गारांचा खच पडला होता. तर ही दृश्य आहेत नाशिक जिल्ह्यातील उमराळेची...

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह अन्य काही भागालाही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा फटका बसला. तर नाशिक शहरातही वादळी वाऱ्यामुळे वडाचं झाड कोसळलं . नेहरू चौकातील वडाचं झाड कोसळल्यानं त्याखाली दबून 5 ते 6 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले... मात्र यात कुणीही नसल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rainfall in Dindori taluka of Nashik district nashik marathi news