कुक्कुटपालनासाठी आणलेल्या कोंबड्याच निघाल्या 'बर्ड-फ्ल्यू' बाधित! आदिवासी शेतकऱ्यांच्या तीनशे कोंबड्या मृत   

साहेबराव काकुळते
Wednesday, 27 January 2021

 वाठोडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा हे आदिवासी लोकवस्तीचे गाव.. या गावातील आदिवासी शेतकरी सुरेश महाले यांनी सुमारे तीनशे कोंबड्या या कुक्कुटपालनाचा व्यवसाय म्हणून आपल्या गावातील घरीच छोट्या शेडमध्ये ठेवले होते. पण त्याच कोंबड्या बर्ड-फ्ल्यू बाधित निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

डांगसौंदाणे (जि.नाशिक) : वाठोडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा हे आदिवासी लोकवस्तीचे गाव.. या गावातील आदिवासी शेतकरी सुरेश महाले यांनी सुमारे तीनशे कोंबड्या या कुक्कुटपालनाचा व्यवसाय म्हणून आपल्या गावातील घरीच छोट्या शेडमध्ये ठेवले होते. पण त्याच कोंबड्या बर्ड-फ्ल्यू बाधित निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

कुक्कुटपालनासाठी आणलेल्या कोंबड्याच निघाल्या 'बर्ड-फ्ल्यू' बाधित!

वाठोडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा हे आदिवासी लोकवस्तीचे गाव असून या गावातील आदिवासी शेतकरी सुरेश महाले यांनी आर. आर. प्रजातीच्या सुमारे तीनशे कोंबड्या या कुक्कुटपालनाचा व्यवसाय म्हणून आपल्या गावातील घरीच छोट्या शेडमध्ये ठेवले होते. कोंबड्यांच्या होणाऱ्या अचानक मृत्युने महाले यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या कोंबड्यांचा अहवाल हा प्रयोग शाळेत पाठवल्यानंतर या कोंबड्या बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उर्वरित दहा ही कोंबड्यांचा पुन्हा मृत्यू

स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत मृत कोंबड्या या जेसीबीने खड्डा खोदून पुरून दिल्याने गावात सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागातील बहुतांश आदिवासी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात गावठी कोंबडी पाळल्या जातात. याच अनुषंगाने प्रशासनाने गंभीर दखल घेत आज दुपारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक सरपंच लक्ष्मण महाले यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांना सूचना देत, आहेत त्या सर्व कोंबड्यांचा बंदोबस्त करण्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी देखील सुरेश महाले यांच्या शेडमध्ये उर्वरित दहा ही कोंबड्यांचा पुन्हा मृत्यू झाल्याचे दिसून आले. बर्ड फ्लू बद्दल आदिवासी जनतेमध्ये फारसी माहिती नसल्यामुळे (ता.२६) वग्रीपाडा येथे पाहणी केली असता सर्वच आदिवासी शेतकऱ्यांच्या कोंबड्या मोकळ्या फिरताना दिसून आल्या. याबाबत सरपंच लक्ष्मण माहले यांच्याशी संपर्क साधला असता उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना आपआपल्या पाळीव कोंबड्या जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात पुरण्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ज्यांच्या कोंबड्या ग्रामपंचायत प्रशासनाला आढळून येतील अशा सर्व कोंबड्या ग्रामपंचायत प्रशासन स्वतः जेसीबीने केलेल्या खड्ड्यात पुरणार असल्याची माहिती सरपंच महाले यांनी दिली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले असून गावात निर्जंतुकी करणासाठी फवारणी करणार असल्याची माहिती ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली आहे. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आजपर्यंत कुठलाही पशुवैद्यक या गावात आला नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली

खरेदीदारांना याबाबत संशय
दरम्यान डांगसौंदाणे आठवडे बाजार असल्याने हा बाजार कोंबड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील 'बर्ड फ्ल्यू'ची सकाळ पर्यंत कोणालाही वार्ता नसल्याने या भागातील बहुतांश आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली कोंबडी आठवडे बाजारात विक्रीसाठी आणली होती. कधी नव्हे इतकी संख्या बाजारात आल्याने खरेदीदारांना ही याबाबत संशय निर्माण झाला होता. दुपारनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आलेल्या माहितीवरून ज्या नागरिकांनी कोंबड्या खरेदी केल्या त्यांना मात्र भीतीचे वातावरण वाटू लागले आहे.

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

जिल्हाधिकाऱ्यांचा तात्काळ आदेश

बागलाणच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेल्या दोन-तीन दिवसात मृत झालेल्या संशयित कोंबड्यांचे नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश काढत या भागातील एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

२२ तारखेला या गावातील आदिवाशी शेतकऱ्याने पक्षी मृत झाल्याची माहिती फोनकॉल वरून दिल्याने या पक्ष्याचे तपासणी अहवाल पुणे आणि भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. मंगळवारी उशिरा अहवाल सकारत्मक आल्याने परिसरातील एक किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. (ता.२७) पशुवैद्यकीय पथक व बर्ड फ्लू नियंत्रण टीम या गावांमध्ये जाऊन किलिंग ऑपरेशन करणार आहे .या भागातील सर्व पक्षी हे पकडून एका विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया करून पुरण्यात येतील- डॉ चंदन रुद्रवंशी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी बागलाण  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hens infected bird flu at vathoda nashik marathi news