हेरगिरीच्या प्रकरणानंतर नाशिक रोडला हाय अलर्ट

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Sunday, 11 October 2020

 एचएएल आणि सैन्यदलात हेरगिरी करणाऱ्या दोन संशयितांना पकडल्यानंतर नाशिक रोडला महत्त्वाच्या प्रशासकीय कार्यालयांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नाशिक : एचएएल आणि सैन्यदलात हेरगिरी करणाऱ्या दोन संशयितांना पकडल्यानंतर नाशिक रोडला महत्त्वाच्या प्रशासकीय कार्यालयांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, कारागृह, तिन्ही मुद्रणालये, गांधीनगर विमानतळ, रेल्वे स्थानकावरील सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. 

येथील मुद्रणालयांची सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. नेहरूनगर येथील शासकीय वसाहतीत पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. रेल्वेस्थानक तसेच तोफखाना केंद्राच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा वाढविली आहे. मुद्रणालयाच्या भोवतीचे जलकुंभ, उंच इमारती सुरक्षा व्यवस्थेच्या रडारवर आहेत. मुद्रणालयाच्या भिंतीजवळील तटबंदी संरक्षित करण्यात आली आहे. नाशिक रोड व उपनगर पोलिस ठाण्यांतर्फे गस्त वाढवण्यात आली आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने रात्री गस्त वाढविली आहे. संशयितांवर लक्ष वाढविले आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सतर्क राहण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 
-सुनील रोहकले (वरिष्ठ निरीक्षक, उपनगर) 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High alert on Nashik Road after spying case nashik marathi news