धक्कादायक! भरधाव पिक-अप थेट बाजारातच घुसली...अन् मग..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

शहरातील सरदार वल्लभभाई पटेल चौकात दर रविवारी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून आठवडेबाजार भरविला जातो. दुपारी पिक-अपचालक हर्षल राठोड याचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप थेट आठवडेबाजारात घुसली.. आणि मग जे काही दृश्य होतं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

नाशिक : शहरातील सरदार वल्लभभाई पटेल चौकात दर रविवारी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून आठवडेबाजार भरविला जातो. दुपारी पिक-अपचालक हर्षल राठोड याचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप थेट आठवडेबाजारात घुसली.. आणि मग जे काही दृश्य होतं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

असा घडला प्रकार...

शहरातील सरदार वल्लभभाई पटेल चौकात दर रविवारी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून आठवडेबाजार भरविला जातो. दुपारी पिक-अपचालक हर्षल राठोड याचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप थेट आठवडेबाजारात घुसत बाजारात खरेदी करण्याकरिता आलेल्या नागरिकांना धडक देत पुढे निघाली. भरधाव पिक-अप (एमएच 48, टी 4509)ने थेट आठवडेबाजारात घुसत आठ जणांना धडक देत जखमी केले. यात दोन ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पिक-अपचालकाविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेवरून इगतपुरी येथे भरणाऱ्या आठवडेबाजारातील सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..​

यांना दिली धडक...

यामध्ये दशरथ भोंडवे (वय 67), रहीम शेख (65) रेल्वेगाडीचालक अरुणकुमार प्रसादीलाल गौतम (42), नाजीम हसन मेमन (रा. उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाले. घटना घडताच चालक राठोडने घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Speed pick-up car accident in market Nashik Marathi News