कसारा घाटात कंटेनरच्या धडकेत महामार्ग कर्मचारी ठार; दोन जखमी

पोपट गंवादे
Sunday, 10 January 2021

या कंटेनरने कसारा घाटात दुरुस्तीचे काम करत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना उडवले. यात एक कर्मचारी जागीच मृत पावला, तर दोन कर्मचाऱ्यांना जबर मार लागला. काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उड्या मारल्या.

इगतपुरी (नाशिक) : नाशिकहून मुंबईकडे जात असताना नवीन कसारा घाटात महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने महामार्गाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापैकी एक ठार, तर दोन जखमी झाले. या घटनेमुळे महामार्ग कर्मचाऱ्यांमध्ये शोकाचे वातावरण आहे.

अशी आहे घटना
 
शनिवारी (ता.९ ) दुपारी बाराच्या दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमएच १२- एफसी ८५१०) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. चालकाने चालत्या गाडीतून उडी मारली. या कंटेनरने कसारा घाटात दुरुस्तीचे काम करत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना उडवले. यात एक कर्मचारी जागीच मृत पावला, तर दोन कर्मचाऱ्यांना जबर मार लागला. काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उड्या मारल्या. सुनील भगत (२५, रा. पेठेचा पाडा, ता. शहापूर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. संतोष कालचिडे, बाळू कामडी (२६, दोघे रा. पेठेचा पाडा, ता. शहापूर) जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास महामार्ग पोलिस सहाय्यक निरीक्षक अमोल वालझाडे करीत आहेत.  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highway workers killed in container collision; Two injured nashik marathi news