२० वर्षीय भाडेकरू तरुणीचा विनयभंग; घरमालकाचीही मारहाण केल्याची तक्रार 

विनोद बेदरकर
Tuesday, 24 November 2020

दोन्ही कुटुंबीय शेजारी-शेजारी राहत असून, शनिवारी (ता. २१) संशयिताने तरुणीच्या घरात प्रवेश करून तिच्या आईला, तुम्ही विजेचा जास्त वापर करतात, यावरून वाद घालत शिवीगाळ केली. तरुणी वाद मिटविण्यासाठी गेली असता...

नाशिक : विजेचा जास्त वापर करतात, या कारणावरून झालेल्या वादात भाडेकरू तरुणीने घरमालकाच्या पुतण्याविरोधात विनयभंगाचा, तर घरमालकाने मारहाणीची तक्रार नोंदवली आहे. पंचवटीतील रोहिणीनगर भागात हा प्रकार घडला. यात जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी

२० वर्षीय भाडेकरू तरुणीने घरमालकाचा पुतण्या मयूर हिरावत याच्याविरोधात तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार दोन्ही कुटुंबीय शेजारी-शेजारी राहत असून, शनिवारी (ता. २१) संशयिताने तरुणीच्या घरात प्रवेश करून तिच्या आईला, तुम्ही विजेचा जास्त वापर करतात, यावरून वाद घालत शिवीगाळ केली. तरुणी वाद मिटविण्यासाठी गेली असता संशयिताने तिचा विनयभंग करीत तुमच्याकडे बघून घेतो, अशी दमदाटी केल्याचे म्हटले आहे. तर संशयिताने दिलेल्या तक्रारीनुसार मुलीसह तिचा भाऊ आणि आईने त्यास बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. यात जखमी संशयितावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

भाडेकरू महिलेस घराबाहेर काढले 
नाशिक : नवनाथनगरला घरमालक महिलेने भाडेकरू महिलेचे सामान घराबाहेर फेकून देत घराबाहेर काढल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सोनी नोनू वाघमारे (रा. नवनाथनगर, पेठ रोड) असे घरमालक महिलेचे नाव असून, त्यांच्याविरोधात सुनीता सुकदेव सहाणे यांनी तक्रार दिली आहे. सहाणे या वाघमारे यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहतात. शनिवारी (ता.२१) त्या घरात नसताना संशयित घरमालक महिलेने बंद घराचे कुलूप तोडून सहाणे यांच्या सामानाची मोडतोड करून सामान घराबाहेर फेकून देत, घरास दुसरे कुलूप लावून खोलीत जाण्यात प्रतिबंध केला, अशी तक्रार पंचवटी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home owner abuse Tenant nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: