तीन मद्यपी युवकांकडून होमगार्डला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल 

प्रमोद दंडगव्हाळ
Thursday, 15 October 2020

रस्त्यात कस्तुरी सुपर मार्केटसमोर एका स्थानिकाने त्यांना थांबवून, त्यासमोरील मोकळ्या जागेत काही युवक दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे सांगितले. यावरून सोनवणे यांनी तीन युवकांना विचारले

नाशिक / सिडको : अंबड पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या एका सेवकास तीन मद्यापींनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दोन संशयितांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

डोक्यात दारूची बाटली फोडल्याने होमगार्ड रक्तबंबाळ
अंबड पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेले बाबासाहेब सोनवणे (वय ३४, रा. साईपूजा रो-हाउस महाजननगर) रात्री पावणेदहाच्या सुमारास रात्रपाळी करण्यासाठी गणवेशावर पोलिस ठाण्यात येण्यास निघाले. रस्त्यात कस्तुरी सुपर मार्केटसमोर एका स्थानिकाने त्यांना थांबवून, त्यासमोरील मोकळ्या जागेत काही युवक दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे सांगितले. यावरून सोनवणे यांनी तीन युवकांना विचारले असता, याचा राग येत संशयित संकेत भालेराव (रा. मोरवाडी), विकी जाधव (रा. सातपूर) तिसरा युवक फरारी आहे. यांनी मारहाण केली

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

त्यातील एकाने सोनवणे यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडल्याने ते रक्तबंबाळ झाले. स्थानिक नागरिकांनी सोनवणे यांची सुटका केली. अंबड पोलिसांना पाचारण करून दोन युवकांना पकडून ठेवले. अंबड पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही युवकांना ताब्यात घेतले.  

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeguard beaten by three drunken nashik marathi news