एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा! एकीकडे घामाच्या पैशांसाठी आक्रोश आंदोलन; दुसरीकडे कर्तव्याचे प्रामाणिक दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

एकीकडे घामाच्या पैशांसाठी कुटुंबीयांसह एसटी कर्मचारी आक्रोश आंदोलन करीत असताना दुसरीकडे मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे खरे दर्शन घडले आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. काय घडले नेमके?

नाशिक : वेतनाच्या आक्रोशातही या कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा एस.टी. विषयी विश्वासार्हता निर्माण करणारा ठरला आहे. एकीकडे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच ऐन दिवाळीच्या तोंडावर आर्थिक परिस्थिती ओढावलेली. ड्युटीचीही शाश्वती नाही. एकीकडे घामाच्या पैशांसाठी कुटुंबीयांसह एसटी कर्मचारी आक्रोश आंदोलन करीत असताना दुसरीकडे मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे खरे दर्शन घडले आहे. ज्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. काय घडले नेमके?

एकीकडे घामाच्या पैशांसाठी आक्रोश आंदोलन; दुसरीकडे कर्तव्याचे प्रामाणिक दर्शन

रविवारी (ता.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास वाडा आगाराची अक्कलकुवा बस नाशिकला दाखल झाली. त्यातून सुरेश सोहली हे प्रवासी उतरले आणि बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. काही वेळानंतर सोहली यांना आपली तीन लाख रुपये असलेली पैशांची बॅग बसमध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी वाहतूक नियंत्रक आर. एम. मथुरे यांना कळविले. मथुरे यांनी वाडा येथील आगाराशी संपर्क करून वाडा-अक्कलकुवा मालेगावमार्गे निघालेल्या वाहकाचा मोबाईल क्रमांक मिळविला. वाहकाशी संपर्क करून  बसमधील बॅग ताब्यात घेण्यास सांगितले.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

बसमध्ये नवीन प्रवासी बसण्यापूर्वीच पैशांची बॅग वाहकाने ताब्यात घेतली. सोहली यांना मालेगाव येथे पाठविले. तेथे त्यांना बसचे वाहक गणेश आसाराम धनगर आणि चालक सदानंद आत्माराम  गुरव यांनी तीन लाख तीनशे रुपयांची रोकड असलेली बॅग परत केली. बसमध्ये राहिलेली एका प्रवाशाची तीन लाखांची बॅग चालक व वाहकांनी  परत करून आपल्या कर्तव्याचे प्रामाणिक दर्शन घडविले.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: honesty of ST employees nashik marathi news