धक्कादायक! ISI चा भारतात एजंट नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप; पाकिस्तानी कटकारस्थानांना नाशिकचे दोघे सहज बळी

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 16 October 2020

महिनाभरातील नाशिकमधील दोन्ही घटना बघता पाकिस्तानकडून भारतात माहिती देणारे एजंट तयार करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे, हेच यातून पुढे येते. त्यामुळे ‘हनी ट्रॅप’मध्ये कुणीही फसू शकतो. सहज उत्सुकता म्हणून विदेशी नागरिकांशी संवाद साधाल तरी फसाल. तुम्ही ‘हनी ट्रॅप’मध्ये फसाल, याची भनकही लागत नाही इतक्या सहजपणे माणूस जाळ्यात अडकतो. 

नाशिक : महिनाभरातील नाशिकमधील दोन्ही घटना बघता पाकिस्तानकडून भारतात माहिती देणारे एजंट तयार करण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे, हेच यातून पुढे येते. त्यामुळे ‘हनी ट्रॅप’मध्ये कुणीही फसू शकतो. सहज उत्सुकता म्हणून विदेशी नागरिकांशी संवाद साधाल तरी फसाल. तुम्ही ‘हनी ट्रॅप’मध्ये फसाल, याची भनकही लागत नाही इतक्या सहजपणे माणूस जाळ्यात अडकतो. महिनाभरात नाशिकचे दोन जण पाकिस्तानला माहिती पुरविताना पकडले गेले. त्यात दोघेही निरागसपणे अलगद जाळ्यात फसल्याचे पुढे आले आहे. शहरातील या दोन्ही घटनांबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गुरुवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत सांगितले. 

लक्षात येणार नाही, इतक्या अलगदपणे लोक फसतात.
दहशतवाद प्रतिबंधक विभागाने अटक केलेला आणि पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला दीपक शिरसाठ असाच लंडन येथील एका संवादात अडकला. त्यात त्याने २०१९ मध्ये संवेदनशील स्वरूपाची माहिती दिली. एखाद्या मुलीला विमानाविषयी एवढी माहिती असू शकते. या कुतूहलापोटी तो सहज फसत गेला. २०१९ मध्ये संवेदनशील माहिती दिली. कुणाशीही असा संवाद साधला जाऊ शकतो. त्यामुळे कुतुहूल म्हणूनही अनोळखी विदेशी व्यक्तीशी संवाद टाळा. लक्षात येणार नाही, इतक्या अलगदपणे लोक फसतात. नकळतपणे महत्त्वाची संवेदनशील माहिती देऊन बसतात, तशी वेळ कुणावरही येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी जागरूकपणे सोशल मीडियावर संपर्क ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

विशेषतः ग्रुप ॲडमिनने काळजी घ्यावी,

नाशिकला तोफखाना केंद्र, विमानतळ, कॅट, सिक्युरिटी प्रेससह अनेक महत्त्वाच्या आस्थापना असून हिंदुस्थान एरोनॅटिक्स लिमीटेड (एचएएल) मधील दीपक शिरसाठ तसेच तोफखाना केंद्रातील मजूर संजीवकुमार हे दोघेही पाकिस्तानी कटकारस्थानांना सहज बळी पडले. नाशिकमध्ये कुणाभोवतीही सापळा लावला जाऊ शकतो. त्यामुळे विदेशी दूरध्वनीबाबत जागरूकपणे वागा, विशेषतः ग्रुप ॲडमिनने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले. 

तोफखान्यातील हेरगिरी 
तोफखाना केंद्राच्या छायाचित्राबाबत ‘हनी ट्रॅप’ नव्हता. विदेशी तरुणांच्या ग्रुपशी संवाद साधाण्याच्या उत्सुकतेपोटी संजीवकुमार (बिहारी मजूर) फसल्याचे पुढे आले आहे. दरवेळी ट्रॅप हा हनी असेलच असे नाही. तो कसाही असू शकतो. संजीवकुमार यानेही ९२३०३५३४२२८९ या पाकिस्तानी नागरिकांच्या सलमान व इब्राहिम नावाच्या व्हॉटसॲपग्रुपवर छायाचित्रे पाठविली. त्याची चौकशी सुरू असून, ३० ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्या बँक खात्याची माहितीही घेण्यात आली असून, त्यात कुठलीही संशयास्पद माहीती पुढे आलेली नाही. देशाबाहेरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधू नका. व्हॉटसॲप ग्रुपमध्ये अनोळखी विदेशींना थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Honey trap to appoint ISI agent in India nashik marathi news