नाशिक औष्णिक वीज केंद्रातील चिमणी पेटण्याची आशा; मार्च महिन्यापासून वीजनिर्मिती शून्यावर

नीलेश छाजेड
Thursday, 8 October 2020

मार्च महिन्यापासून आजपर्यंत नाशिक औष्णिक वीज केंद्राची निर्मिती शून्यावर आहे. संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात राज्याची विजेची मागणी अवघ्या तेरा हजारावर आली होती. त्यामुळे काही महिने नाशिक, भुसावळ, कोराडी व परळी येथील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

नाशिक/एकलहरे : राज्यात लॉकडाऊन बहुतांशी उठला आहे. बंद असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये पण काम सुरू झाल्याने राज्याची वीजेची मागणी २० हजार मेगावॅट वर गेल्याने नाशिक येथील किमान एक संच तरी सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

मार्च महिन्यापासून आजपर्यंत नाशिक औष्णिक वीज केंद्राची निर्मिती शून्यावर आहे. संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात राज्याची विजेची मागणी अवघ्या तेरा हजारावर आली होती. त्यामुळे काही महिने नाशिक, भुसावळ, कोराडी व परळी येथील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.टप्प्या टप्प्याने जसजसे उद्योग धंदे पूर्ववत सुरू होऊ लागले तसतशी विजेच्या मागणीत वाढ झाली. कोराडी, भुसावळ व आता परळी येथून वीज निर्मिती सुरू झाली आहे.

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

मागणी वाढल्यास वीजनिर्मिती सुरू

सध्याच्या मितीला राज्यातील महानिर्मितीच्या ३० संचा पैकी वीस संच सुरू आहेत. त्यात औष्णिकची वीजनिर्मिती ५ हजार ६१८ मेगा वॅट होती. येत्या काळात मागणी आणखी वाढल्यास नाशिक औष्णिक वीज केंद्रातूनही वीज निर्मिती सुरू होईल अशी कामगारांना आशा वाटते आहे. कोराडी येथील ६६० मेगा वॅट चे ३ संच सुरू आहेत, खापरखेडा सर्व पाचही संच, पारस येथील २, परळी वीज केंद्रातील तीन, चंद्रपूर पाच व भुसावळ येथील दोन संचांमधून वीज निर्मिती सुरू आहे. येत्या सणासुदीच्या काळात आणखी हजार ते दोन हजार मेगा वॅट ने मागणी वाढल्यास नाशिक मधून वीजनिर्मिती सुरू होईल.

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

वीज केंद्र /क्षमता मेवॅट /निर्मिती       
नाशिक   /       ६६०     /    ०००
कोराडी    /    २४००    /    ८२६
खापरखेडा /  १३४०     /  १०२६
पारस         /    ५००     /    ३६५
परळी          /  ११७६     / ४९६
चंद्रपूर          / २९२०    / १७५५
भुसावळ      /  १२१०    /   ८७६

आज सकाळी राज्याची मागणी २०४१३ मेगा वॅट होती तर सर्व स्रोतातून १३५८० मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hope to start power generation at Nashik Thermal Power Station