
बाबा शेख खुनाच्या घटनेतील आरोपी अमीर ऊर्फ समीर खान याचे एकलहरे रोड येथील घर अज्ञात व्यक्तींनी जाळले. कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
नाशिक रोड : बाबा शेख खुनाच्या घटनेतील आरोपी अमीर ऊर्फ समीर खान याचे एकलहरे रोड येथील घर अज्ञात व्यक्तींनी जाळले. कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
बाबा शेख खून प्रकरणातील आरोपीचे पेटविले घर
हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या समीर उर्फ मुर्गीराजा याचे अरिंगळे मळ्यातील घर अज्ञात व्यक्तींनी काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील सिन्नरफाटा अरिंंगळे मळा येथे राहणारा संशयित आरोपी समीर सलीम खान उर्फ मुर्गी राजा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक घराला कुलूप लावून इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुर्गी राजाच्या घराचा दरवाजा तोडून कपाट, फ्रिज, दरवाजे आदी वस्तूवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घरात आग लावली.दरम्यान, क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने आजुबाजुचे रहिवाशी जागे झाले. तोपर्यंत संपुर्ण घर आगीच्या फेऱ्यात पडलेले होते.
हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर
एकूण एक लाखाचे नुकसान;पोलिसांत तक्रार
घरातील फर्निचर, वस्तू असे एकूण एक लाखाचे नुकसान झाले. आमीर खान याची पत्नी आसमा खान यांनी नाशिक रोड पोलिसांत तक्रार दिली. आमीर खान हा बाबा शेख याच्या खूनप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे. तेव्हापासून घर बंद आहे. आमीर खान याची पत्नी सध्या भीमनगर येथे माहेरी राहते. अग्निशमन दलाचे एम. एन. मधे, एफ. बी. भालेराव, आर. एन. दाते, एस. के. आडके, एम. के. साळवे आदींच्या पथकाने आग विझविली. सराईत गुन्हेगार नवाज ऊर्फ बाबा शेख याची डीजीपीनगर-१ येथील साईमंदिराजवळ गोळी झाडून करण्यात आला होती. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. याबाबत तत्काळ नाशिकरोड अग्निशमन दलाला माहिती कळविण्यात आली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत घराला लागलेली आग विझविली.
हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश