चारित्र्याच्या संशयावरून पत्नी गेली माहेरी...नवऱ्याने सासरी पोहचत केला 'हा' प्रकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

अमोल शिंदे यास दारुचे व्यसन आहे. चारित्र्यावर संशय घेत तो वारंवार पत्नीला शिवीगाळ व मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून आली होती. त्यानंतर नवरा पोहचला सासरी..अन् दारूच्या नशेत त्याने केला धक्कादायक प्रकार..

नाशिक : नवऱ्याला दारुचे व्यसन आहे. चारित्र्यावर संशय घेत तो वारंवार पत्नीला शिवीगाळ व मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून आली होती. त्यानंतर नवरा पोहचला सासरी..अन् दारूच्या नशेत त्याने केला धक्कादायक प्रकार..

असा घडला प्रकार

पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल शिंदे यास दारुचे व्यसन आहे. चारित्र्यावर संशय घेत तो वारंवार पत्नीला शिवीगाळ व मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून आली होती. पत्नीने सासरी येण्यासाठी त्याने कुरापत काढून पत्नी, सासू, सासरे व मेहुणीला शिवीगाळ व मारहाण केली. पत्नीवर त्याने चाकूहल्ला केला. त्यावेळी पिंटू गायकवाड मध्यस्थी झाला असता त्यास त्याच्यावरही त्याने चाकूहल्ला केला. पुढील तपास पोलीस हवालदार बोळे करत आहेत.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

चारित्र्यावर संशय घेत पतीने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत चाकूहल्ला केला. ही घटना सोमवारी (दि.१८)दुपारी गंगापूर रोडवरील संतकबीरनगर परिसरात घडली. याप्रकरणी पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल विष्णू शिंदे (रा. जगतापववाडी, सातपुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband attack on wife nashik crime marathi news