गंभीर प्रकार! जाब विचारल्याच्या रागात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड; विवाहितेचे फुटले डोके  

विनोद बेदरकर
Wednesday, 19 August 2020

दारू पिऊन कोठे फिरता? याचा जाब विचारल्याचा राग पतीच्या डोक्यात होता. तो राग इतका वाढत गेला कि दारूच्या नशेत देहभान हरपून त्याच्या हातून भयानक कृत्य घडले. मळगाव शिवारातील शेतात हा प्रकार घडला.वाचा सविस्तर प्रकार

नाशिक / मालेगाव : दारू पिऊन कोठे फिरता? याचा जाब विचारल्याचा राग पतीच्या डोक्यात होता. तो राग इतका वाढत गेला कि दारूच्या नशेत देहभान हरपून त्याच्या हातून भयानक कृत्य घडले. मळगाव शिवारातील शेतात हा प्रकार घडला.वाचा सविस्तर प्रकार

असा घडला प्रकार

यात वत्सलाबाई थोरात (वय ३५) या विवाहितेचे डोके फुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. पती दीपक थोरात याला, ‘दारू पिऊन कोठे फिरतात’, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने मळ्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरी आल्यावर चारित्र्यावर संशय घेऊन कुऱ्हाड मारून डोके फोडले. तसेच जिवंत सोडणार नाही, अशी दमबाजी केल्याची तक्रार वत्सलाबाई यांनी पती दीपकविरुद्ध दिली आहे. रागात पतीने  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत लाथाबुक्क्यांनी व कुऱ्हाडीने जबर मारहाण केली.  तालुका पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा >दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

दुसरी घटना : दागिन्यांसाठी विवाहितेचा छळ 
पतीला गोटफार्म टाकण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून सुनीता देवरे (वय ३५, रा. खडकी) या विवाहितेचा छळ करीत तिच्या अंगावरील सोने व दागिने काढून घेऊन घरातून हाकलून देणाऱ्या पती जयप्रकाश देवरे, सासरे विनायक देवरे, सासू, दीर व नणंद अशा पाच जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पाच वर्षांपासून पतीसह सर्व संशयित पैशांसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार सुनीता देवरे यांनी दिली आहे. 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband hit wife nashik marathi news