esakal | ....म्हणून पतीने दिली आपल्याच पत्नीची सुपारी...अखेर रहस्य उलघडले..धक्कादायक प्रकार!
sakal

बोलून बातमी शोधा

married woman 123.jpg

पुरावा नष्ट करण्यासाठी नीताचा मृतदेह महामार्गालगतच्या नाल्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी विनय वाघ याच्याकडून विल्होळी येथे पाच लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम नंतर घेऊन येण्यास सांगितले. पती नारायण चित्ते याने पत्नी हरवल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दिली होती.

....म्हणून पतीने दिली आपल्याच पत्नीची सुपारी...अखेर रहस्य उलघडले..धक्कादायक प्रकार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

00029 
चांदवड : नीता चित्ते खूनप्रकरणी संशयित आरोपी भरत देवचंद मोरे याला अटक करताना नाशिक ग्रामीणचे पोलिस. 
------- 
सुपारी देऊन पत्नीचा खून 
---- 
महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले; दोघांना पोलिस कोठडी 

नाशिक / चांदवड : पुरावा नष्ट करण्यासाठी नीताचा मृतदेह महामार्गालगतच्या नाल्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी विनय वाघ याच्याकडून विल्होळी येथे पाच लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम नंतर घेऊन येण्यास सांगितले. पती नारायण चित्ते याने पत्नी हरवल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दिली होती.

असा घडला प्रकार

महिला नीता चित्ते (वय 49, रा. चित्ते प्लाझा, गजपंथ म्हसरूळ, नाशिक) इतर पुरुषांशी वारंवार अनैतिक संबंध ठेवते, म्हणून पती नारायण चित्ते त्रासून गेला होता. तिला त्याने वेळोवेळी समजावून सांगूनही तिच्या वर्तनात फरक पडत नव्हता. त्याचा राग मनात धरून नारायण चित्ते याने जवळचा मित्र विनय वाघ (वय 52, गुलमोहरनगर म्हसरूळ) याच्या मदतीने भरत मोची ऊर्फ मोरे (28, रा. भीमनगर, उल्हासनगर) यास नीताला ठार करण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली. मृत नीता रविवारी (ता. 14) सकाळी पती नारायण चित्ते याला सांगून सिडकोच्या उत्तमनगरमध्ये माहेरी गेली होती. संशयित भरत मोरे याने वाहिद अली शराफत अली (रा. पंचशीलनगर, उल्हासनगर) याच्यासह नीताला व्हॉट्‌सऍपवरून चॅटिंग करून आडगाव नाक्‍यावरील उड्डाणपुलाजवळ बोलविले.
 

पत्नीसाठी रचला प्लॅन...

नीताने आई-वडिलांना गुजरातला जाते, असे सांगितले. भरत मोरे याने नीताला स्विफ्ट कार (एमएच 01, पीए 5632)मध्ये बसविले व राहूड घाटात नेले तेथे साडीने गळा आवळून ठार केले व पुरावा नष्ट करण्यासाठी नीताचा मृतदेह महामार्गालगतच्या नाल्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी विनय वाघ याच्याकडून विल्होळी येथे पाच लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम नंतर घेऊन येण्यास सांगितले. पती नारायण चित्ते याने पत्नी हरवल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी संशयित पती नारायण चित्ते, विनय वाघ यास ताब्यात घेतले. भरत मोची व वाहिद अली शराफत अली या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नारायण चित्ते, विनायक वाघ यांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना 30 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयित भरत मोची याला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक निरीक्षक स्वप्नील राजपूत, उपनिरीक्षक मुकेश गुजर, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र शिलावट, हवालदार संजय गोसावी, सुशांत मरकड, मंगेश गोसावी, प्रदीप भैरम यांनी केली.

हेही वाचा > निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..

खुनाचे रहस्य उलगडले. 

राहूड शिवारातील नाल्यात मंगळवारी (ता. 16) आढळलेल्या मृत अनोळखी महिलेची ओळख पटली असून, चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच सुपारी देऊन तिचा खून केला आहे. या प्रकरणी पतीसह दोघांना पोलिस कोठडी देण्यात आली. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व चांदवड पोलिसांनी तीन दिवसांत या प्रकरणाचा तपास करून महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले. 

हेही वाचा > MPSC RESULT : नाशिकच्या उमेदवारांचा "एमपीएससी'त विविध पदांवर डंका!