'सीमेवर युद्धाला घाबरलो नाही, तर आता कसा घाबरणार?'...शेवटी कोरोनाला हरवलचं

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

"अनेकता में एकता इस देश की शान है, इसलिए मेरा भारत महान है!', असा नारा देत 22 वर्षे भारतीय सैन्यदलात देशाची सेवा केली. पाच वर्षांपासून महाराष्ट्र पोलिस म्हणून राज्याची सेवा करतोय. देशसेवेत असताना सीमेवर रात्रंदिन युद्धाचा प्रसंग व जिवाला धोका असूनही घाबरलो नाही, तर कोरोनाला कसा घाबरणार? 

नाशिक : "अनेकता में एकता इस देश की शान है, इसलिए मेरा भारत महान है!', असा नारा देत 22 वर्षे भारतीय सैन्यदलात देशाची सेवा केली. पाच वर्षांपासून महाराष्ट्र पोलिस म्हणून राज्याची सेवा करतोय. देशसेवेत असताना सीमेवर रात्रंदिन युद्धाचा प्रसंग व जिवाला धोका असूनही घाबरलो नाही, तर कोरोनाला कसा घाबरणार? 

हरायचं नाही हरवायचं...

मी मधुकर पवार मालेगावजवळच्या सौंदाणेचा. सध्या नाशिक मुख्यालयात आहे. मालेगावच्या आयेशानगर चौक व अपना सुपर मार्केट इथं कोरोना बंदोबस्त व नाकाबंदीसाठी ड्यूटी लागली. रोज बारा-बारा तास ड्यूटी होती. अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याच्या बातम्या येत असल्यानं कुटुंबात चिंतेचं वातावरण होतं. मालेगावला ड्यूटी असल्याने लोक संशयानं बघायचे. ड्यूटीवर असतानाच सर्दी व घसा दुखू लागला. तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो. वैद्यकीय उपचार, नियमित गरम पाणी, आयुर्वेदिक काढा, नियमित व्यायाम व योगासनं, सैन्यदलात असल्यापासून लागलेली कष्टाची सवय या बळावर कोरोनाला हरवून पूर्ण बरा झालो. 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश

अभिमान याचा, की देशावर आलेल्या जैविक संकटावर मात करण्याची संधी या निमित्तानं मिळाली. कोरोनाला हरवून पूर्ण बरा झालोय. आता जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा हजर होणार आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If they were not scared of war on the border, how could they be scared of Corona nashik marathi news