IGP प्रताप दिघावकर इन अ‍ॅक्शन मोड! शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात

रामदास कदम
Monday, 14 September 2020

 खऱ्या अर्थाने नाशिकचे भूमीपुत्र असलेले परिक्षेत्राचे आय जी प्रताप दिघावकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सुरू झाल्याचे जिल्ह्यात चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे येणार्‍या हंगामात शेतकऱ्यांची काही अंशी का होईना फसवणूक थांबणार असून बळीराजा आपला एका जबाबदार अधिकारी जिल्ह्याचे भूमिपुत्र यांच्या विधानाला बळकटी मिळवून ​देईल यात शंका नाही.

नाशिक / दिंडोरी : खऱ्या अर्थाने नाशिकचे भूमीपुत्र असलेले परिक्षेत्राचे आय जी प्रताप दिघावकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सुरू झाल्याचे जिल्ह्यात चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे येणार्‍या हंगामात शेतकऱ्यांची काही अंशी का होईना फसवणूक थांबणार असून बळीराजा आपला एका जबाबदार अधिकारी जिल्ह्याचे भूमिपुत्र यांच्या विधानाला बळकटी मिळवून पुन्हा जोमाने आपल्या द्राक्ष शेती लक्ष पूर्ण पणे केंद्रित करणार आहे. काय घडले वाचा...

शेतकऱ्यांना फसवाल तर याद राखा..

नाशिक विभागीय प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेणे येथील शेतकरी वर्गाने रविवारी (ता.14) नाशिक परिक्षेत्राचे आय जी प्रताप दिघावकर नाशिक यांची सकाळी अकरा वाजता भेट घेऊन द्राक्ष व्यापाऱ्यांकडे अटकलेले पैसे मिळावे याबाबत निवेदन दिले. यावेळी प्रताप दिघावकर यांनी खडक सुकेने येथील गावकऱ्याचे शेतकरी शिष्टमंडळाला आश्वासन दिले, की आपल्या परिसरात किंवा नाशिक जिल्ह्यात विभागात द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतात फसवणूक होऊ नये म्हणून मी व महाराष्ट्राचे पोलीस आपल्या सोबत असून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिल्यास संबंधितांचे मुसक्या आवळण्याची काम करु असे सांगितले व तसे संबंधितांना दिले.

खाकी दणक्याने संबंधित शेतकऱ्यांना रक्कम मिळाली

प्रताप दिघावकर यांनी नाशिक परिक्षेत्र चार्ज घेतला, त्यावेळी नाशिकचे भूमीपुत्र असल्याने आपण या भागात प्रथम शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला व त्या बातमीची कात्रणे प्रथमता खडक सुकेने येथील शेतकऱ्यांनी सदर बातमी एका व्यापाऱ्याला दाखवली व काही वेळात पैसे मिळाले. त्यानंतर काल पुन्हा शेतकरी शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन त्याही बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आज खडक सुकेणे येथील बापू तात्या पालखेड यांना तीन लाख रुपये आणि सुभाष पंढरीनाथ गणोरे यांना एक लाख 14 हजार रुपये अशा प्रकारची द्राक्षे व्यापारी कडे असलेली रक्कम नुसत्या बातमीच्या दणक्याने संबंधित शेतकऱ्यांना आज मिळाले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

IGP प्रताप दिघावकर इन अ‍ॅक्शन मोड!

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खऱ्या अर्थाने नाशिकचे भूमीपुत्र असलेले परिक्षेत्राचे आय जी प्रताप दिघावकर यांच्या कामकाजाची पद्धतीत शेतकऱ्यांचे न्याय देणे चे काम सुरू झाल्याचे जिल्ह्यात चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे येणार्‍या हंगामात शेतकऱ्यांची काही अंशी का होईना फसवणूक थांबणार असून बळीराजा आपला एका जबाबदार अधिकारी जिल्ह्याचे भूमिपुत्र यांच्या विधानाला बळकटी मिळवून पुन्हा जोमाने आपल्या द्राक्ष शेती लक्ष पूर्ण पणे केंद्रित करणार आहे. अशाच प्रकारचे काम भविष्यकाळात साहेबांकडून मिळेल अशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सदिच्छा व्यक्त केली व महाराष्ट्र पोलीस खात्याचा दणका खऱ्या अर्थाने काय याचा आज अनुभव असल्याने प्रमुख्याने खडक सुकेणे गावातील शेतकरी या घटनेमुळे आनंदित झाला आहे.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IGP Pratap Dighavakar in Action Mode nashik marathi news