esakal | नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई! आंबोली घाटात लाखोंची दारु पकडली

बोलून बातमी शोधा

Illegal liquor seized at Amboli Ghat nashik marathi news

नवीन वर्षाच्या स्वगतासाठी सगळे तयार झाले असतानाच अवैध मद्य वाहतुकीच्या घटना वाढल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या विशेष भरारी पथकाने आज रविवारी (ता. २७) आंबोली घाटात केलेल्या कारवाईत लाखोंची दारु पकडली आहे. 

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई! आंबोली घाटात लाखोंची दारु पकडली
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : नवीन वर्षाच्या स्वगतासाठी सगळे तयार झाले आहेत मात्र या दरम्यान अवैध मद्य वाहतुकीच्या घटना वाढल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या विशेष भरारी पथकाने आज रविवारी (ता. २७) आंबोली घाटात केलेल्या कारवाईत लाखोंची दारु पकडली आहे. 

उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक राजेश धनवटे, विजेंद्र चव्हाण, शाम पानसरे, दीपक आव्हाड, गौरव तारे, विष्णू सानप, महेश सातपुते यांच्या पथकाने आज रविवारी पहाटे सापळा रचून पांढऱ्या रंगाची कार (जीजे ०५ आरजे ६२७६) अडवून तपासणी केली. 

५ लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कारच्या चोरकप्यात पंजाब निर्मित व केवळ दादरा व नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेली स्कॉच विदेशी पकडली. त्यात ब्लॅक डॉग स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४४ बाटल्या, वॅट ६९ स्कॉच व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १३ बाटल्या व ब्लॅडर प्राईड व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ४ बाटल्या व कार असा एकूण ५ लाख ३९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक मनिष नानुभाई खेनी याला ताब्यात घेण्यात आले. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप