लॉकडाउनमध्ये फायनान्स कंपनीकडून वारंवार पैशाची मागणी...शिवसैनिकांकडून भांडाफोड!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

शासकीय परवानगी न घेता मुथूट मायक्रो फायनान्स कंपनीचे वसुली विभागाचे कार्यालय सुरू आहे. येथील वसुली अधिकारी कर्जदारांकडून फोनद्वारे वारंवार पैशाची मागणी करीत आहेत. सर्वत्र "लॉकडाउन' असल्याने कर्जदारांना उत्पन्नाचे कुठलेही स्त्रोत नसताना वसुली अधिकाऱ्यांचा जाच कर्जदारांना सहन करावा लागत आहे.

नाशिक / सिडको : शासकीय परवानगी न घेता मुथूट मायक्रो फायनान्स कंपनीचे वसुली विभागाचे कार्यालय सुरू आहे. येथील वसुली अधिकारी कर्जदारांकडून फोनद्वारे वारंवार पैशाची मागणी करीत आहेत. सर्वत्र "लॉकडाउन' असल्याने कर्जदारांना उत्पन्नाचे कुठलेही स्त्रोत नसताना वसुली अधिकाऱ्यांचा जाच कर्जदारांना सहन करावा लागत आहे

शिवसैनिकांकडून असा झाला भांडाफोड 

शिवसेना इंदिरानगर विभागप्रमुख नीलेश साळुंखे व सिडको विभागप्रमुख सुयश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, रुंगटा मॉल येथे शासकीय परवानगी न घेता मुथूट मायक्रो फायनान्स कंपनीचे वसुली विभागाचे कार्यालय सुरू आहे. येथील वसुली अधिकारी कर्जदारांकडून फोनद्वारे वारंवार पैशाची मागणी करीत आहेत. सर्वत्र "लॉकडाउन' असल्याने कर्जदारांना उत्पन्नाचे कुठलेही स्त्रोत नसताना वसुली अधिकाऱ्यांचा जाच कर्जदारांना सहन करावा लागत आहे. यावरून शिवसैनिक अंबड लिंक रोडवरील रुंगटा मॉल येथील गाळा क्रमांक 46 मध्ये पोचले असता त्यांना येथील वसुलीचे कार्यालय उघडे असल्याचे आढळले. येथील अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी विचारणा केली असता त्यांच्याकडे शासकीय परवानगीचे कागदपत्र नसल्याचे आढळले. शिवसैनिकांनी अंबड पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी अक्षय खतौड या शाखा अधिकाऱ्यावर कलम 188 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

अंबड पोलिसांत प्रतिबंधात्मक कारवाई

देशभरात "लॉकडाउन' सुरू असतानाही खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली विभागाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी अंबड पोलिसांच्या सुपूर्द केले. याप्रकरणी अंबड पोलिसांत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 

शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल 

नागरिकांना खासगी फायनान्स कंपनी वसुलीसंदर्भात काही अडचणी असल्यास शिवसैनिकांशी संपर्क साधावा, बेकायदा वसुली करणाऱ्यांना शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल. - सुयश पाटील, शिवसेना विभागप्रमुख, सिडको 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal recovery Action from finance company nashik marathi news