नाकाबंदी दरम्यान ट्रकच्या संशयास्पद हालचाली.. पोलीसांनी तपासणी करताच धक्का! 

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 20 June 2020

शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी सुरू असतांना पोलिसांना (एमएच 10 ए क्यू 6140) चारचाकी ट्रक संशयास्पद जातांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात धक्कादायक बाब उघडकीस आली.

नाशिक : शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी सुरू असतांना पोलिसांना (एमएच 10 ए क्यू 6140) चारचाकी ट्रक संशयास्पद जातांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात धक्कादायक बाब उघडकीस आली.

काय घडले नेमके?

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राऊ चौकी जवळ नाकाबंदी दरम्यान बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुमारे 19 लाख रुपयांची अंदाजे 4 हजार किलो सुगंधित तंबाखू माल पकडला आहे. शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी सुरू असतांना पोलिसांना (एमएच 10 ए क्यू 6140) चारचाकी ट्रक संशयास्पद जातांना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू भरलेली असल्याचे निष्पन्न झाले याबाबत पोलिस ठाण्यात माहिती कळविण्यात येऊन सदर ट्रक पोलिस ठाण्यात नेण्यात आला.पोलिस ठाण्यात सदर ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सुगंधित तंबाखू पोते आढळून आले. पोलिसांनी सुगंधित तंबाखू माल, चारचाकी वाहन तसेच चालकासह दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. सुगंधित तंबाखू व वाहन असा जवळपास 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल

याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सांगितले.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal transport of aromatic tobacco seized nashik marathi news