नात्याला काळीमा फासणारी घटना : मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने मामानेच केला भाचीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना म्हसरुळ परिसरात घडली आहे. चुलत मामाने अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याने ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : (म्हसरुळ) मामा-भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना म्हसरुळ परिसरात घडली आहे. चुलत मामाने अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याने ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी आहे घटना

कुणाल जाधव (21, मूळ रा. लोणघाट, कोथळी, ता. मोहताळा, जि. बुलढाणा) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार, संशयित कुणाल हा पीडितेच्या आईचा चुलत भाऊ आहे. गेल्या 4 मार्च रोजी संशयिताने पीडितेची 13 वर्षांची मुलीला मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घराच्या हॉलमध्ये नेले आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच सदरील घटनेची वाच्यता केल्यास कुटूंबियांसह तिला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र गेल्या 23 जून रोजी अल्पवयीन मुलीला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिच्या आईने दिला दवाखान्यात नेले असता, अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात पोक्‍सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपासा महिला उपनिरीक्षक जाधव या करीत आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The incident of uncle raped niece took place in Nashik nashik marathi news