कहर थांबेना..! 'इथले' सात चिमुकले कोरोनाच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

कोरोना रुग्णांच्या संदर्भात बुधवारी (ता.3) रात्री दहापर्यंत आलेल्या 249 जणांच्या अहवालात 192 निगेटिव्ह, तर जिल्ह्यात नव्याने 61 बाधित रुग्ण वाढले आहेत. यामध्ये चार चिमुकल्यांसह 15 बाधित रुग्ण तर उशिरा आलेल्या अहवालात मालेगावात तीन बालके बाधित आढळली.

नाशिक : कोरोना रुग्णांच्या संदर्भात बुधवारी (ता.3) रात्री दहापर्यंत आलेल्या 249 जणांच्या अहवालात 192 निगेटिव्ह, तर जिल्ह्यात नव्याने 61 बाधित रुग्ण वाढले आहेत. यामध्ये चार चिमुकल्यांसह 15 बाधित रुग्ण मनमाड शहरातील, तर उशिरा आलेल्या अहवालात मालेगावात तीन बालके बाधित आढळली. दरम्यान, बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वडाळी (ता. नांदगाव) मधील मृताचा समावेश आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या आता 77 झाली आहे. 

दिवसभरात 61 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात मंगळवारी (ता. 2) कोरोनाबाधित 32 रुग्ण आढळले, तर बुधवारी (ता.3) दुपारी दीडला प्रयोगशाळेकडून 91 रिपोर्ट आले. त्यात 69 रिपोर्ट निगेटिव्ह, तर 22 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये 15 रुग्ण मनमाडचे आहेत. इगतपुरी तालुक्‍यातील रायंबेतील दोन महिला, येवल्यातील पाडळे गल्लीतील दोघे, तर नांदगावातील वाडाळीतील एक महिला बाधित आले आहेत. तर आडगाव पोलिस मुख्यालयात आणखी एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. या 22 रुग्णांत मनमाडमधील 15 रुग्णांमध्ये चार व सहा वर्षांचा बालक, तर पाच व सात वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. नाशिक शहरात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात, सिडकोतील उत्तमनगर येथील 52 वर्षीय व 22 वर्षीय युवक या पिता-पुत्राचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर गीताई बंगलो, नाशिक येथील 43 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. जुन्या रुग्णाच्या संपर्कातील कर्मा हाइट्‌स, तपोवन रोड, नाशिक येथील 38 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आहे. कोणार्कनगर, दत्तमंदिर, आडगाव शिवार येथील 30 वर्षीय महिलेचाही अहवाल कोरोनाबाधित आहे. म्हसरूळ, कलानगर येथील 46 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

79 जणांच्या अहवालात 64 जण निगेटिव्ह

रात्री पावणेदहाला मालेगावातील आलेल्या 79 जणांच्या अहवालात 64 जण निगेटिव्ह, तर 15 जण पॉझिटिव्ह आले. तर रात्री दहाला आलेल्या तिसऱ्या अहवालात 97 जणांपैकी 58 निगेटिव्ह, तर 18 पॉझिटिव्ह आले. यात सात जण मालेगावातील झाकिर हुसेन हॉस्पिटल, प्रत्येकी एक तपोवन व बिटको कोविड सेंटर, 5 समाजकल्याण कोविड सेंटर, तर उर्वरित चारमध्ये पंचवटीतील गजानन चौकातील 35 वर्षीय, अमृतधाम, विडी कामगार सोसायटीतील 32 वर्षीय, पाथर्डी फाटा भागातील गौतमी रेसिडेन्सीमधील 25 वर्षीय तरुण, तर कुंभारवाड्यातील काझीची गढी भागातील 62 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase of 61 newly corona infected patients in nashik district marathi news