Coronaupdate : जिल्ह्यात दिवसभरात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ७५ ने वाढ; तर अकरा जणांचा मृत्‍यू

अरुण मलाणी
Saturday, 5 September 2020

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ४) दिवसभरात एक हजार ११२ कोरोनाबाधित आढळून आले असून, एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ५६५ झाली आहे. एक हजार २६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या ३३ हजार १६२ झाली आहे. 

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ४) दिवसभरात एक हजार ११२ कोरोनाबाधित आढळून आले असून, एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ५६५ झाली आहे. एक हजार २६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या ३३ हजार १६२ झाली आहे. 

शुक्रवारी बरे झाले एक हजार २६ रुग्‍ण

दिवसभरात अकरा जणांचा मृत्‍यू झाला असून, मृतांची संख्या ९११ वर पोचली आहे. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्‍या संख्येत ७५ ने वाढ झाली आहे. तर सद्यःस्‍थितीत सात हजार ४९२ बाधित उपचार घेत आहेत. शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ९३३ रुग्ण असून, नाशिक ग्रामीण १६९, मालेगाव तीन, जिल्‍हाबाह्य सात रुग्‍णांचा त्यात समावेश आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ७२१, नाशिक ग्रामीणचे २५१, मालेगावचे ५०, तर जिल्‍हाबाह्य चार रुग्ण आहेत. तर दिवसभरात नाशिक शहरातील पाच आणि ग्रामीण भागातील सहा जणांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार २७०, नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात १८५, मालेगाव व गृहविलगीकरणात ५१, डॉ. वसंतराव पवार महाविद्यालय रुग्णालयात ३४, जिल्‍हा रुग्‍णालयात १४ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत तीन हजार ३३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक एक हजार ५५९ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase of 75 active patients in the district during the day nashik marathi news