Increase in mobile sales during lockdown nashik marathi news
Increase in mobile sales during lockdown nashik marathi news

लॉकडाउन काळात मोबाईल विक्रीत वाढ; व्यवसायाची तब्बल १ कोटींची भरारी  

नाशिक: (डीजीपी नगर)  कोरोना लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्स, खबरदारीचे उपाय, बातम्या, गेम, करमणूक आणि त्याचे अपडेट, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलला अनन्यसाधारण महत्व आले आहे. मोबाईल अत्यावश्‍यक गरज बनल्याने या पाच सहा महिण्यात मोबाईलची अचानक मागणी वाढल्याने १ कोटीहून आधिकची उलाढालीची मोबाईल मार्केटने भरारी घेतली. 

ग्राहकांची झुंबड

लॉकडाउन आणि 14 दिवसांचे क्वांरटाईन, यात येणारा एकाकीपणा टाळण्यासाठी सामान्यांचा संपर्क तुटल्याने मोबाईल हाच पर्याय राहिला. मुलांच्या आॅनलाईन शिक्षणापासून शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्स, मीटिंग ऑनलाईन योगा, करमणुकीचे माध्यम, कोरोनाचा लेखाजोगा त्यावर उपचार पद्धती , कोरोना काढा, उपदेश, समुपदेशन समाजातील प्रत्येक कामकाजात मोबाईल एकमेव उपाय झाला. लहानग्यांपासून वयोवृद्ध आजोबांपर्यत प्रत्येकाची गरज बनलेला मोबाईल घेतांना पोटाला चिमटा लावून किडूक मिडूक विकून, गहाण ठेवून मोबाईल विकत घेण्यासाठी, जुना असेल तर तो दुरुस्ती करणे आणि त्यासाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली. 

मोबाईलला अनन्यसाधारण महत्त्व

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा,महात्मा गांधी रोड, कॉलेज रोड वरील दुकानात मोबाईल खरेदी ,जुन्या मोबाईलची दुरुस्ती स्पेअर पार्ट बदलीच्या दैनंदिन व्यवहाराने लाखोंची उसळी घेतली.मोबाईल हा दैनंदिन महत्वाचे महत्वाचा घटक बनला आणि मोबाईलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले या अनुषंगाने त्यापासून लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाणाही वाढले आहे. मोबाईलचा गरजेप्रमाणे वापर करणे महत्त्वाचे आहे. जागतिक मंदीचे सावट असताना आटोमोबाईल आणि मोबाईल मार्केट ने घेतलेली भरारी १ कोटीपर्यत होती. 

मोबाईल विक्रीत विक्रमी वाढ झाली असून दहा हजारापर्यंत रोखीने दहा हजाराच्या वरती फायनान्स द्वारे लोक मोबाइल खरेदी करत आहेत जुने मोबाईल रिपेरिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे विवो ओप्पो मोबाईलचे व स्पेअर पार्ट चे उत्पादन भारतात सुरू झाल्यामुळे या काळात १ कोटीच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. 
- ओंकार जाधव (मोबाईल सिटी) 


माझ्या घरात 3 मुलांच्या ऑनलाईन शिक्षणसाठी मला माझ्या पत्नीचे दागिने गहान ठेवून मोबाईल विकत घ्यावा लागला 
- दीपक पवार (अशोका मार्ग नाशिक)  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com