esakal | लासलगांव येथे कांद्याच्या दरात सुधारणा; दरात वाढ  
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 3.jpg

अतिवृष्टीमुळे राज्यासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेशातील नवीन लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने चाळीत साठविलेल्या शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी देशांतर्गत वाढली आहे.

लासलगांव येथे कांद्याच्या दरात सुधारणा; दरात वाढ  

sakal_logo
By
अरुण खंगाळ

नाशिक / लासलगाव : अतिवृष्टीमुळे राज्यासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेशातील नवीन लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने चाळीत साठविलेल्या शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी देशांतर्गत वाढली आहे.

लासलगांव येथे कांद्याच्या दरात सुधारणा 

मागणीच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची आवक होत नसल्याने गुरुवारी (ता. ८) कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल ६०० रुपयांची सरासरी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे लासलगाव बाजार समितीत ४३९ वाहनांतून कांद्याची चार हजार ७४४ क्विंटल आवक झाली होती. कांद्याला कमाल चार हजार ४०० रुपये, सरासरी तीन हजार ५०१ रुपये, तर किमान एक हजार रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला.  

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

संपादन - ज्योती देवरे