येवल्यात लाल कांदा आवकेत वाढ; बाजारभावातही काहीशी सुधारणा

onion demand.jpeg
onion demand.jpeg

येवला (नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली. तर लाल कांदा आवकेत वाढ होत असून, बाजारभावात थोडीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले. 

बाजारभावात काहीशी सुधारणा 

लाल कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात कांदा आवक २८ हजार १६१ क्विटल झाली. बाजारभाव किमान ३०० ते कमाल २,३६२ तर सरासरी १,७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. लाल कांद्याचे बाजारभाव ५०० ते २,६५२ तर सरासरी २,३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. अंदरसूल उपबाजारात कांद्याची आवक ११ हजार १७३ क्विंटल झाली. बाजारभाव २०० ते २,००१ तर सरासरी १,५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. लाल कांद्याचे बाजारभाव ५०० ते २,७२७ तर सरासरी २,४०० प्रतिक्विंटलपर्यंत होते. गव्हाच्या आवकेत वाढ होऊन आवक २५० क्विटल झाली. बाजारभाव १,३०० ते २,००० तर सरासरी १,५०० रुपयांपर्यंत होते. बाजरीच्या आवकेत घट झाली. तर स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. आवक १५७ क्विंटल झाली असून, बाजारभाव १,०५० ते कमाल १,२०० तर सरासरी १,१३० रूपयांपर्यंत होते. 

कडधान्याची आवकही मंदावली 

हरभऱ्याच्या आवकेत घट झाली. बाजारभाव ३,२०० ते ३,८९९, तर सरासरी ३,७५१ रुपयापर्यंत होते. तुरीच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. तुरीची आवक ११ क्विंटल झाली असून, बाजारभाव ४,६०० ते ५,०५१ तर सरासरी ४,८०० रुपयांपर्यंत होते. सोयाबीनची आवक १२४ क्विंटल झाली. तर व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. बाजारभाव ३,३३३ ते कमाल ४,३६५ तर सरासरी ४,१०१ रुपयांपर्यंत होते. मक्याची आवक २६ हजार ३७० क्विंटल झाली असून, बाजारभाव १,०८० ते १,४३२ तर सरासरी १,३३० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते, अशी माहिती सचिव कैलाश व्यापारे यांनी दिली.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com