अनलॉक होताच येवल्यात चोऱ्यांमध्ये वाढ..पोलीसांवरील ताण पाहताच घेतला फायदा 

theft 1234.jpg
theft 1234.jpg

नाशिक / येवला : राज्यातील लॉकडाउन जून महिन्यामध्ये काहीसे शिथिल होताच ठप्प झालेले बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाले असतानाच चोऱ्यांचे प्रमाणदेखील आता वाढू लागले आहे. तीन महिन्यांत तालुक्‍यात चोऱ्यांच्या तीसहून अधिक घटना झाल्या असून, यात सर्वाधिक चोऱ्या मोटारसायकलींच्या आहेत. गेल्या दोन-तीन आठवड्यांत तालुक्‍यात छोठ्या-मोठ्या चोऱ्यांच्या अनेक घटनादेखील घडल्याने नागरिकांनीदेखील काळजी घेण्याची गरज आहे. 

लूटमार, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे सत्र 
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये सर्वत्र बंद असल्याने आणि नागरिकही घरातच बसून असल्याने उन्हाळात चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आणि चोऱ्यांचे सत्रही वाढले. अजूनही पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असल्याने याचा फायदा चोरटे घेत असल्याचेही तालुक्‍यातील काही घटनांतून दिसून आले. 
मागील दोन आठवड्यांत तालुक्‍यात शेळ्या, मोबाईल, घरफोडी, लूटमारीच्या घटनाही पुढे आल्या आहेत. तसेच मागील काही दिवसांत तालुक्‍यातील अनकुटे येथील एका टोळीने पालघरच्या व्यापाऱ्याला कोपरगाव शिवारात लुटले, बाभूळगाव येथे किरण गायकवाड यांच्या घरापुढून दोन नव्या मोटारसायकली रात्रीतून चोरीला गेल्या आहेत. थळकर वस्तीजवळ एकजण मोबाईलवर बोलत असतानाच हातातून मोबाईल हिसकावला. धामणगावला एका शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीस गेल्या आहेत.

गवंडगावला मोटारसायकलीसह पेट्रोलपंपावर तीन हजार लिटर डिझेलची चोरी झाली, तर अंदरसूलला दळे वस्ती येथील पंढरीनाथ जाधव यांच्या मालकीच्या किराणा दुकानचे शटर वाकवून रोकड व किराणा माल चोरून नेल्याची घटना घडली. कातरणी येथे संतोष कदम यांच्या घरातून चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी सोने, पैशासह वस्तू नेल्या. त्यामुळे नागरिक आता अधिक सावध होत आहेत. 

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

14 मोटारसायकली गायब 
मार्चपासून जूनपर्यंत शहर व तालुक्‍यात घरफोड्या व चोऱ्यांच्या 12 घटना घडल्या असून, मोटारसायकल चोऱ्या वीसवर आहे. मात्र दोन्ही पोलिस ठाण्यांत 14 मोटारसायकली चोरीची नोंद आहे. विशेष म्हणजे मेमध्ये एकही घटना झाली नसली तरी जूननंतर चोऱ्यांच्या दहावर घटना झाल्या आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com