"भरउन्हात सात महिन्याचं लेकरू कडेवर..अन् निघाला बाबा नाशिकहून मध्यप्रदेशकडं..!"पायी चालतानाचे भीषण चित्र

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 17 April 2020

कोरोना म्हणजे काय, याचा मागमूसही नसलेली चिमुकली भरउन्हात आई- वडिलांसोबत पायी चालतानाचे भीषण चित्र दिसत आहे. गावाची ओढ तर लागली आहे. मात्र तेथपर्यंत पोचण्यासाठी चौक्‍या, पोलिसांचे पहारे टाळत जीव मुठीत धरून कधी आडवाटेने, तर कधी महामार्गाने मजल- दरमजल करीत कुणी फाटक्‍या पादत्राणाने तर काही अनवाणी चालत आहेत. 

नाशिक / ओझर : लॉकडाउन वाढले, घरात जेवढे धान्य, किराणा होता तोदेखील संपला, हाताला काम नसल्याने पैसाअडका नाही. त्यामुळे गावापर्यंत पोचणे हाच एक पर्याय आहे, अशी व्यथा सात महिन्यांचे बाळ कडेवर घेऊन नाशिकहून मध्य प्रदेशकडे मार्गक्रमण करणाऱ्या दयानंद या मजुराने मांडली. 
ओझर येथून मुंबई-आग्रा महामार्गावर रोज अनेक मजूर कुटुंबे मार्गक्रमण करताना दिसत आहेत.

अंगाखांद्यावर लहान मुले असल्याचे चित्र

त्यातील कुणाच्या हातात खाण्यासाठी कोरडा शिधा होता, तर कोणाच्या अंगाखांद्यावर लहान मुले असल्याचे चित्र बघायला मिळाले. कोरोना म्हणजे काय, याचा मागमूसही नसलेली चिमुकली भरउन्हात आई- वडिलांसोबत पायी चालतानाचे भीषण चित्र दिसत आहे. गावाची ओढ तर लागली आहे. मात्र तेथपर्यंत पोचण्यासाठी चौक्‍या, पोलिसांचे पहारे टाळत जीव मुठीत धरून कधी आडवाटेने, तर कधी महामार्गाने मजल- दरमजल करीत कुणी फाटक्‍या पादत्राणाने तर काही अनवाणी चालत आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

नाशिक ते मध्य प्रदेश कुटुंबासोबत पायी जाण्याचा निर्णय
आम्ही नाशिक येथे रोजंदारी आणि बिगारी काम करत होतो. धान्य आणि पैसेही संपले. मालक बिहारचे होते. लॉकडाउन झाल्याने मालकही गावी निघून गेल्याने उपासमारीची वेळ आली असल्याने आम्ही नाशिक ते मध्य प्रदेश कुटुंबासोबत पायी जाण्याचा निर्णय घेतला. - दयानंद, बिगारी कामगार, मध्य प्रदेश 

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased lockdown re-opens workers nashik marathi news