रात्रीस खेळ चाले! बाईक्सच्या पेट्रोलच्या नळ्या तोडल्या जाताएत...सकाळी नागरिकांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

दुचाकीच्या पेट्रोलच्या नळ्या तोडल्या जात असल्याचा धक्कादायक  प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यावर एक-दोन नव्हे, तर तब्बल 40 पेक्षा जास्त दुचाकींसोबत हा प्रकार झाल्याचे उघडकीस आले.

नाशिक / सिडको : दुचाकीच्या पेट्रोलच्या नळ्या तोडल्या जात असल्याचा धक्कादायक  प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यावर एक-दोन नव्हे, तर तब्बल 40 पेक्षा जास्त दुचाकींसोबत हा प्रकार झाल्याचे उघडकीस आले. ​

वाढत्या घटना; पोलिसांचे दुर्लक्ष 

सिडकोत दुचाकींतून पेट्रोलचोरी होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोरीसंदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. उत्तमनगर येथील श्रीराम मंदिर चौक परिसरात मागच्या आठवड्यात दुचाकींमधील पेट्रोलची चोरी झाली. शनिवारी, रविवारी पुन्हा दुसऱ्या गल्लीत दुचाकींमधील पेट्रोलचोरी झाली. मध्यरात्री एकाच वेळी काही चोरटे लक्ष ठेवून पेट्रोल लंपास करीत आहेत. दुचाकीच्या पेट्रोलच्या नळ्या तोडून त्याला बाटल्या लावून चोरी केली जात आहे. हा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यावर एक-दोन नव्हे, तर तब्बल 40 पेक्षा जास्त दुचाकींमधील पेट्रोलचोरी झाल्याचे उघडकीस आले. या संदर्भात पोलिसांनी केवळ अर्ज दाखल करीत केराची टोपली दाखविली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कारवाईची मागणी इक्‍बाल शेख, राजेश दळवी, गोकुळ पाटील, अनिल साळुंखे, दिगंबर मोरे, चंदन गुजराती, संजय नवले, गौतम लोखंडे, जगदीश विसपुते आदींनी केली. 

हेहा वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

हेही वाचा > नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing incidence of patrols in Uttamnagar Ignorance of the police nashik marathi news