महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत "खासगीं'ची घुसखोरी..दुकानदारीसाठी 'हा' नवा फंडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एजन्टप्रमाणेच महापालिकेच्या आरोग्य विभागात रुग्णांच्या पळवापळवीची "प्रॅक्‍टिस' सध्या सुरू आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगून कुठे ऍडमिट होऊ, असे विचारणाऱ्याला खासगी रुग्णालयांत पाठविले जात आहे. काही विशिष्ट खासगी रुग्णालयांच्या दुकानदारीसाठी हा नवा फंडा आता वापरला जात आहे.

नाशिक : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एजन्टप्रमाणेच महापालिकेच्या आरोग्य विभागात रुग्णांच्या पळवापळवीची "प्रॅक्‍टिस' सध्या सुरू आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगून कुठे ऍडमिट होऊ, असे विचारणाऱ्याला खासगी रुग्णालयांत पाठविले जात आहे. काही विशिष्ट खासगी रुग्णालयांच्या दुकानदारीसाठी हा नवा फंडा आता वापरला जात आहे. 

महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत "खासगीं'ची घुसखोरी 
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास यंत्रणेतील संबंधितांशी संपर्क करण्यास सांगायचे. रुग्णाने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून रुग्णालयात ऍडमिट होण्यासंदर्भात चौकशी केल्यास, थोड्या वेळाने फोन करतो, असे सांगायचे. नंतर काही वेळाने पुन्हा कॉल करून विशिष्ट रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला द्यायचा, अशी ही पद्धतशीर प्रॅक्‍टिस आहे. एवढेच नव्हे, तर महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांनादेखील असाच अनुभव येत आहे. त्यामुळे विशिष्ट खासगी रुग्णालयांची दुकानदारी चालविण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांत काही एजन्ट सक्रिय असल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना लुटण्याचा हा आणखी नवा प्रकार समोर आला आहे. लुटीच्या या नव्या फंड्यात महापालिकेचे डॉक्‍टरदेखील सहभागी असल्याने ही बाब गंभीर होत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

...असा आहे नवा फंडा 
महापालिकेच्या रुग्णालयातून रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी भाग पाडले जाते, ही बाब आता नवी राहिलेली नाही. महासभा, स्थायी समिती सभेत नगरसेवकांनीच अशा प्रकारचे आरोप अनेकदा केले आहेत. परंतु त्यावर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. कोरोनाच्या निमित्ताने मात्र खासगी रुग्णालयांत उपचारासाठी रुग्ण पाठविले जात असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. एखाद्याने डॉक्‍टरांना फोन केल्यास "खासगी की सरकारी' असा प्रश्‍न केला जातो. सरकारी, असा संदेश आल्यानंतर बेड खाली नाही. त्यामुळे खासगीमध्ये भरती व्हा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णांकडून "कुठल्या रुग्णालयात', असा प्रश्‍न आपोआपच येतो अन्‌ त्यानंतर सुरू होतो रुग्ण भरतीचा पुढील प्रवास.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infiltration of private in the municipal health system

फोटो गॅलरी