Sakal Impact : कृषी विभागाकडून भात शेतीची पाहणी; शेतावर येऊन कृषी पर्यवेशकांचे मार्गदर्शन

के.टी.राजोळे.
Thursday, 1 October 2020

वाडीव-हे येथील निवृत्ती, कातोरे नंदु राऊत यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या पिकावर तुडतुड्याने पांढरा टाका व करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेताला भेट देऊन पाहणी केली.

नाशिक/वाडीवऱ्हे : इगतपुरी तालुक्यतील भात पिकांवर पांढराटाका रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाले असून आज सकाळमधील भात ऊत्पादक हवालदिल आठवड्यात भात पिकाची वाट, या वृत्ताची दखल घेऊन इगतपुरीचे कृषी पर्यवेशक सी.पी.आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या भात शेतावर येऊन शेतक-यांनी कोणते औषध फवारावे याचे मार्गदर्शन केले. 

वाडीव-हे येथील निवृत्ती कातोरे, नंदु राऊत यांच्यासह काही शेतकऱ्यांच्या पिकावर तुडतुड्याने पांढरा टाका व करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेताला भेट देऊन पाहणी केली. आकोले म्हणाले की, तपकीरे तुडतुड्याने हा रोग होतो. ऊष्ण दमट वातावरणात त्याची वाढ झपाट्याने होते. त्यावर अँसीफेट ऐकीरा या किटक नशकाची फवारावे. चार,पाच दिवसात रोग आटोक्यात आला नसल्यास क्युनोल फाँस या किटक नाशकाची फवारणी करावी. करपा रोगावर मँकोझन काँपर आँक्झीक्लोराइड किटक नाशकाची फवारणी करावी. काळजी पुर्वक फवारणी कल्यास रोगावर नियंत्रण मिळवता येते. रोगास सुरवात झाल्यावर युरीया खत भात पिकास देऊ नये. युरीया मुळे भात पिक हिरवेगार होते हिरव्या पानातील हारीत द्रव्य हे किटकांचे आवडते खाद्य आसल्याने कीटकाची वाढ मोठ्या प्रमाणात होऊन रोग झपाट्याने वाढतो. काही शेतात तुरंब्या दिसतात किटक भाताच्या खोडातच वास्तव्य करून भात दाण्यांंना जाऊ देत नसल्याने भातचे दाणे पोकळ होतात. त्यात तांदुळ तयार होत नाही असे कृषी विभागाच्या सूत्रांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. 

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

कृषी विभागाच्या सूचना 

- लागन झाल्यावर युरिया खत देउ नका 
- क्युनोल फास किटकनाशकाची फवारा 
- करपा रोगावर मँकोझन काँपर नाशक वापरा 

अँसीफेट ऐकीरा या किटक नशकाची फवारावे. चार,पाच दिवसात रोग आटोक्यात आला नसल्यास क्युनोल फाँस या किटक नाशकाची फवारणी करावी. करपा रोगावर मँकोझन काँपर आँक्झीक्लोराइड किटक नशकाची फवारणी करावी. 
- सी.पी.आकोले (कृषी पर्यवेक्षक)  

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of rice field by the Department of Agriculture nashik marathi news