धक्कादायक! डॉक्टराने कोरोना रुग्णावर केले परस्पर उपचार...आणि झाला भयंकर परिणाम!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

जायखेडा येथील खासगी वाहनचालकाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. येथील डॉक्‍टरने संसर्गजन्य लक्षणे असताना शासनाला न कळवता परस्पर उपचार केले व योग्य सुरक्षितता बाळगली नसल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा परिणाम अत्यंत भयानक झाल्याचे निर्दशनास आले. कारण..

नाशिक / जायखेडा : जायखेडा येथील खासगी वाहनचालकाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. येथील डॉक्‍टरने संसर्गजन्य लक्षणे असताना शासनाला न कळवता परस्पर उपचार केले व योग्य सुरक्षितता बाळगली नसल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा परिणाम अत्यंत भयानक झाल्याचे निर्दशनास आले. कारण..

काय झाला परिणाम?

शासनाच्या कोरोनासंदर्भातील उपाययोजना व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता रुग्णावर उपचार केल्याप्रकरणी येथील खासगी डॉक्‍टर राहुल बागूल यांच्यावर जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे. जायखेडा येथील खासगी वाहनचालकाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचार करणारे खासगी डॉक्‍टरांसह संपर्कातील 46 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. येथील डॉक्‍टरने संसर्गजन्य लक्षणे असताना शासनाला न कळवता परस्पर उपचार केले व योग्य सुरक्षितता बाळगली नसल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोविड-19 अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे तपास करीत आहेत. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interactive treatment of corona patients Crime against the doctor nashik marathi news