'गृहविलगीकरणातील रुग्ण सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास कारवाई करावी' - दादा भुसे

प्रमोद सावंत
Saturday, 12 September 2020

प्रभागातील छोट्या गटारी त्याला जोडण्याबरोबरच वेळोवेळी स्वच्छता न केल्याने शहरात पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात व बेसमेंटमधील दुकानात जाते. त्याचा नागरिकांना मोठा त्रास होतो. महानगरपालिकेने त्याची तात्काळ दखल घेऊन अंमलबजावणी करावी. भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री. भुसे म्हणाले.

नाशिक : (मालेगाव) शहरासह ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता तपासून पहावी. गृहविलगीकरणातील रुग्ण सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. 12) दिल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा मुक्त संचार रोखावा

श्री. भुसे म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांचे निर्जंतुकीकरण याबाबत प्रशासनाने वेळोवेळी सूचना दिल्या तरी नागरिक त्याचे पालन करीत नाहीत. नागरिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोवीड रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा मुक्त संचार रोखावा. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयासाठी लागणारा ऑक्सिजन व उपलब्ध औषध साठ्याची श्री. भुसे यांनी माहिती घेतली. डॉ. महाले, डॉ. ठाकरे व डॉ. निकम यांनी माहिती दिली. 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यांतील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे.

महानगरपालिकेने आवश्यक सुविधा पुरवाव्या

15 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत होणारी मोहीम यशस्वी करून कोवीड मुक्त राज्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भुयारी गटारी झाल्या. प्रभागातील छोट्या गटारी त्याला जोडण्याबरोबरच वेळोवेळी स्वच्छता न केल्याने शहरात पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात व बेसमेंटमधील दुकानात जाते. त्याचा नागरिकांना मोठा त्रास होतो. महानगरपालिकेने त्याची तात्काळ दखल घेऊन अंमलबजावणी करावी. भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही श्री. भुसे म्हणाले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

यावेळी उपमहापौर निलेश आहेर, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. हितेश महाले, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, शहर अभियंता कैलास बच्छाव उपस्थित होते.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Isolation increases infection from patients Probability should be explored, dada bhuse