BREAKING : मालेगावच्या जवानाचे कर्तव्य बजावताना अरुणाचलमध्ये निधन

दिपक देशमुख
Friday, 30 October 2020

माणके येथील जवान मनोराज शिवाजी सोनवणे (वय ३५) आसाम येथे कार्यरत असतांना (ता. ३०) रोजी शाहिद झाले. घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. 

नाशिक/मालेगाव : (झोडगे) माणके येथील जवान मनोराज शिवाजी सोनवणे (वय ३५) आसाम येथे कार्यरत असतांना (ता. ३०) रोजी शाहिद झाले.
 घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. 

१६ वर्षांपासून भारतीय लष्कर सेवेत कार्यरत

भारतीय सैन्य दलातील पॅरा फोर्स कमांडर म्हणून सेवेत कार्यरत असलेले मनोराज शिवाजी सोनवणे हे गेल्या १६ वर्षांपासून भारतीय लष्कर सेवेत कार्यरत होते. अरूणाचल प्रदेशात लष्करी सेवा बजावत असतांना प्रकृती बिघडल्याने त्यांना कोलकता येथील लष्करी रूग्णालय भरती करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान शुक्रवारी (ता. ३०) रोजी पहाटे १.३० रोजी निधन झाले. माणके येथील शेतकरी कुटुंबातील मनोराज सोनवणे २००५ मध्ये भारतीय लष्करातील मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. तर २००९ मध्ये २१ पॅरा कमांडोमध्ये सेवा देत होते. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी जयश्री सोनवणे, मुलगा तुषार सोनवणे (६), मुलगी तनू सोनवणे (३) असा परिवार आहे. कोलकता येथून सोनवणे यांचे पार्थिव विमाने मुंबई येथे येईल. तेथून मालेगाव तालुक्यातील माणके या मुळगावी लष्करी इतमामात अंतसंस्कार करण्यात येतील. प्रशासनाच्या वतीने शहिद जवानांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jawan Manoraj Sonawane from Malegaon was martyred nashik marathi news