नाशिक तहानलेले...मात्र यंदा लाभक्षेत्र समाधानी...'हे' धरण भरल्याने दिलासा!

Jayakwadi.jpeg
Jayakwadi.jpeg
Updated on

नाशिक : नाशिकला पाऊस झाला तरी नाशिककरांना जायकवाडीची चिंता असते. आजचे चित्र म्हणजे नाशिकचे प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत. पाऊस कमी आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्र नाशिक तहानलेले, लाभक्षेत्र मराठवाडा समाधानी असे आहे. यंदा मात्र 102.67 टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी प्रकल्पात सोमवारी (ता. 18) 76 टीएमसी अर्थात 74 टक्के जलसंचय झाल्याने औरंगाबादचे धरण भरले तरीही दिलासा मात्र नाशिक आणि नगरला मिळाला आहे. 

जायकवाडी प्रकल्पात 65 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा

नाशिक हा धरणांचा जिल्हा आहे. मात्र येथील पाटबंधारे प्रकल्पांवर सातत्याने समन्यायी पाणीवाटपाचा दबाव असतो. यंदा मराठवाड्यात 15 ऑगस्टपूर्वीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 2016 मधील निर्देशानुसार जायकवाडी प्रकल्पात 65 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे निदान या वर्षी तरी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, प्रवरा, मुळा पाटबंधारे प्रकल्पांतून पाणी सोडण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. यापूर्वी 2012 मध्ये जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसार पाणी सोडावे यासाठी मराठवाड्यातील काही संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यातून नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद तयार झाला होता. 

नेत्यांची राजकारणाची क्षुधाही शांत

या याचिकेच्या निकालात मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक-नगर-मराठवाड्याला पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे निर्देश दिले होते. नव्याने पाणी उपलब्ध होईपर्यंत समन्यायी पाणी वापर कायदा 2005 नुसार कार्यावाहीचे निर्देश होते. गेली काही वर्षे नाशिक व नगर आणि मराठवाड्यातील नेत्यांत पाण्याच्या प्रश्नावर राजकारण, आरोप, प्रत्यारोप नित्याचे झाले आहेत. मराठवाड्यातील नेत्यांकडून नाशिकची धरणे बॅाम्बने उडवून देण्यापर्यंतची भाषा वापरली गेली आहे. यंदा मात्र या राजकारणावर पाणी पडले आहे. नेत्यांची राजकारणाची क्षुधाही शांत झाली.

नाशिक तहानलेले, मराठवाडा तृप्त 

अनेक वर्षात प्रथमच धरणांचा जिल्हा नाशिक कोरडा तर त्यावर अवलंबून असलेले लाभक्षेत्र असलेला जायकवाडी प्रकल्प पाणीदार असे चित्र निर्माण झाले आहे. पैठण येथे गोदावरी नदीवरील धरणाची क्षमता 102.67 टीएमसी आहे. या धरणाचे क्षेत्र पाचशे चौरस किलोमीटर असे विस्तीर्ण आहे. त्याला भोगालीक अनुकुलता नाही. त्यामुळे हे धरण पुर्णतः गोदावरी व पालखेड (नाशिक) आणि प्रवरा (नगर) या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस व धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते. औरंगाबाद, जालना यांसह मराठवाड्यातील मोठे सिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्याच्या नियोजन त्यावर अवलंबून असते. त्यामुळे नाशिकला पाऊस झाला तरी नाशिककरांना जायकवाडीची चिंता असते. आजचे चित्र म्हणजे नाशिकचे प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत. पाऊस कमी आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्र नाशिक तहानलेले, लाभक्षेत्र मराठवाडा समाधानी असे आहे.

यंदा जायकवाडी प्रकल्पात 74 टक्के साठा झाला आहे. ही समाधानाची बाब आहे. मात्र त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न मिटलेला नाही. यानिमित्ताने कोकणातील पाणी तसेच अन्य पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे महत्वाचे आहे. पश्‍चिम वाहिन्या नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी वापरात कसे येईल, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. - राजेंद्र जाधव, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस जलचिंतन सेल.

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com