सात तोळ्यांचे दागिने घालणे महिलेस पडले महागात; विवाहसोहळ्यात भामट्याने साधली संधी

योगेश मोरे
Tuesday, 12 January 2021

 वैभवी शेळके पती तसेच मुलांसमवेत विवाहासाठी जात असताना सायंकाळी काळा शर्ट परिधान करून काळ्या प्लसरवर आला आणि संधी साधली....

म्हसरूळ (जि.नाशिक) : वैभवी शेळके पती तसेच मुलांसमवेत विवाहासाठी जात असताना सायंकाळी काळा शर्ट परिधान करून काळ्या प्लसरवर आला आणि संधी साधली....

सात तोळ्यांचे दागिने घालणे पडले महागात

गंगापूर रोड येथील वैभवी शेळके यांनी याबाबत तक्रार दाखल केली. रविवारी (ता.१०) सायंकाळी शेळके औरंगाबाद रोडवर असलेल्या लॉन्सवर पती तसेच मुलांसमवेत विवाहासाठी जात असताना सायंकाळी साडेसातच्या सुमाराला काळा शर्ट परिधान करून काळ्या प्लसरवर आलेल्या भामट्याने शेळके यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र, सोन्याची एक तोळ्याची चैन व एक तोळ्याचे सोन्याचे गंठन मणीमंगळसूत्र ओरबाडून नेले. काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरू असले तरी पोलिस प्रशासनाला सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यास उघडपणे अपयश येत आहे.  

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

चोरट्याविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा

आडगाव शिवारातील औरंगाबाद रोडवर लॉन्समध्ये नातेवाइकांच्या विवाह सोहळ्यासाठी जाणाऱ्या गंगापूर रोडवरील महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांची सुमारे सात तोळ्यांची सोनसाखळी प्लसरवरून आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना घडली. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jewelry snacthing nashik crime marathi news