'काझीगढी कोसळण्याची  वाट पाहत आहात का?' स्थानिकांचा प्रशासनाला सवाल 

 Kazigadhi is in danger of collapsing nashik marathi news
Kazigadhi is in danger of collapsing nashik marathi news
Updated on

जुने नाशिक : अनेक पावसाळे आले न् गेले. मात्र धोकादायक काझीगढीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. गेल्या ४९ वर्षांपासून येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मंत्र्यांपासून ते नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी केवळ आश्‍वासनाचे गाजर दाखविले आहे. माळीण गावासारखी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहे का, असा प्रश्न गढीवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. 

परिस्थिती ‘जैसे थे’

ऐतिहासिक काझीगढी अतिशय धोकादायक स्थितीत आली आहे. दर वर्षी पावसाळ्यात गढीची माती खचून ढासळण्याचे प्रकार घडत आहेत. ४९ वर्षांत चार वेळेस मोठ्या प्रमाणावर गढी ढासळण्याचे प्रकार घडले आहेत. गढीच्या संरक्षण भिंतीबाबत केवळ आश्‍वासन मिळत आले आहे. पहिल्या वेळेस १९७१ मध्ये गढी ढासळण्याची घटना घडली होती. त्या वेळी राज्याच्या नगरविकासमंत्र्यांनी भेट देत पाहणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत पाच सरकारे बदलली, अनेक नगरसेवक निवडून आले न् गेले. तरी अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यानंतर १९८६, २०१५, २०१९ या वर्षी गढी ढासळली होती. 

साठ कोटींचा निधी कुठे? 

दोन वर्षांपूर्वी ६० कोटींचा निधी आल्याची चर्चा पसरली होती. त्या आशयाचे फलकही परिसरात झळकले होते. प्रत्यक्षात मात्र त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न विचारत आहेत. महापालिका मात्र दर वर्षी नित्यनेमाने नोटिसांचा सोपस्कार बजावत असते. 

गढीच्या प्रश्‍नावर अनेक वर्षांपासून महापालिकेशी पाठपुरावा करत आहे. हाती निराशाच पडत आहे. मते मागण्यासाठी सर्व येतात. परंतु संरक्षण भिंत बांधून देण्यास अद्याप कुणी पुढे सरसावले नाही. 
-रतन काळे, रहिवासी 

पावसाळा आला की जीव टांगणीला लागतो. प्रशासनाने केवळ रहिवाशांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. दुर्घटना घडल्यापूर्वी गढीस संरक्षण भिंत बांधून आमचे रक्षण करावे. 
-कासूबाई सोनवणे, रहिवासी  

संपादन - रोहित कणसे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com